'मी आजारी आहे...', निधनाआधी अनिल मेहतांनी दोन्ही मुलींना केला होता फोन; काय झाला संवाद?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 09:41 AM2024-09-12T09:41:57+5:302024-09-12T09:42:53+5:30

Malaika Arora Father Death: अनिल मेहता हे मलायकाचे सावत्र वडील होते.

Anil Mehta talked to Malaika Arora and Amrita on call before the incident | 'मी आजारी आहे...', निधनाआधी अनिल मेहतांनी दोन्ही मुलींना केला होता फोन; काय झाला संवाद?

'मी आजारी आहे...', निधनाआधी अनिल मेहतांनी दोन्ही मुलींना केला होता फोन; काय झाला संवाद?

अभिनेत्री मलायका अरोराचे (Malaika Arora)  सावत्र वडील अनिल मेहता (Anil Mehta)  यांनी काल बांद्रा येथील राहत्या घरी सहाव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. ही नक्की आत्महत्या होती की अपघात याचा पोलिस तपास करत आहेत. ही घटना घडली तेव्हा मलायकाची आई घरातच होती. तर मलायका पुण्याला गेली होती. बातमी कळताच मलायका तातडीने मुंबईत परतली. या दु:खद प्रसंगी मलायकाला तिच्या अनेक जवळच्या लोकांनी साथ दिली.  दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी अनिल मेहता यांनी दोन्ही मुलींशी फोनवर संवाद साधल्याचं समोर आलं आहे.

अनिल मेहता यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस सध्या तपास करत आहेत. पोलिसांच्या सांगण्यानुसार, "अनिल मेहता यांनी बुधवारी सकाळी ९ वाजता इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या केली. ही घटना घडण्याआधी त्यांनी आपल्या दोन्ही मुली मलायका आणि अमृताला फोन केला होता. मी आजारी आहे, खूप थकलोय एवढंच ते बोलले होते. तसंच तेव्हा मलायकाची आई जॉयस या घरातच होत्या. दोन्ही मुलींना आपला त्रास सांगितल्यानंतर ते सिगरेट ओढायची आहे असं सांगत बाल्कनीत गेले आणि त्यांनी आत्महत्या केली."


सध्या मलायका, अमृता आणि त्यांची आई जॉयस यांना प्रचंड धक्का बसला आहे. जॉयस या पोलिसांना सहकार्य करत आहेत. त्यांनी आपले स्टेटमेंटही दिले आहे. दोन्ही मुली आपल्या सावत्र वडिलांच्या खूप जवळ होत्या. त्यांच्या या दु:खद प्रसंगी इंडस्ट्रीतील अनेक जणांनी त्यांना धीर दिला. सर्वात आधी अरबाज खान घरी पोहोचला. त्यानंतर सलीम खान, सलमा खान, हेलन, सोहेल, अर्पिता असं अख्खं खान कुटुंब पोहोचलं. शिवाय अर्जुन कपूर, करीना कपूर, करिष्मा या देखील बेस्ट फ्रेंडसाठी तातडीने पोहोचल्या. सध्या या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.

Web Title: Anil Mehta talked to Malaika Arora and Amrita on call before the incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.