रिअल हिरो! Animal फेम मनज्योत सिंहने वाचवले आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे प्राण; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 11:50 AM2024-01-06T11:50:57+5:302024-01-06T11:52:02+5:30

मनज्योत सिंहने त्याच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केलाय.

Animal fame actor Manjjot Singhh saved girl s life who was trying to do suicide | रिअल हिरो! Animal फेम मनज्योत सिंहने वाचवले आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे प्राण; Video व्हायरल

रिअल हिरो! Animal फेम मनज्योत सिंहने वाचवले आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे प्राण; Video व्हायरल

रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) Animal सिनेमाने बॉक्सऑफिसवर सर्वात जास्त कमाई करत रेकॉर्डच रचला आहे. सिनेमातील अनेक पात्र गाजली. यासोबतच रणबीरच्या चुलत भावांच्या भूमिकेत दिसलेल्या शीख कलाकारांनीही प्रेक्षकांचं मन जिंकलं. याच कलाकारांपैकी एक अभिनेता मनज्योत सिंहने (Manjjot Singh) नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये मनज्योतने आत्महत्या करणाऱ्या एका मुलीला वाचवलं आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.

मनज्योत सिंहने त्याच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ २०१९ सालचा आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगी इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असते. आजुबाजूचे लोकही शॉक होतात तर खाली इमारतीखाली असलेले लोक जमा होतात. ती मुलगी जशी उडी मारणार असते तेवढ्यात मनज्योत तिथे पोहोचतो आणि तिचा हात पकडतो. अगदी सिनेमातील सीन वाटावा तसाच हा प्रसंग आहे. मनज्योत त्या मुलीला हात धरुन वरती खेचतो. मनज्योतने शेअर केलेला हा व्हिडिओ व्हायरल होतोय. नेटकऱ्यांनी 'रिअल हिरो' म्हणत त्याचं कौतुक केलं आहे.

Animal मध्ये मनज्योत सिंहने रणबीरच्या चुलत भावाची भूमिका साकारली आहे. यामध्ये शेवटी त्याचा खून होतो. मनज्योतची भूमिका प्रेक्षकांना भलतीच आवडली आहे. मनज्योत रिअल लाईफमध्येही हिरो असल्याची प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. 

१ डिसेंबर रोजी Animal रिलीज झाला. सिनेमाने वर्ल्डवाईड 900 कोटी रुपयांचा बिझनेस केला. बाप आणि मुलाच्या नात्यावर सिनेमाची कहाणी आधारित आहे. सिनेमात बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी यांती भूमिका आहे.

Web Title: Animal fame actor Manjjot Singhh saved girl s life who was trying to do suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.