Animal : 'ॲनिमल'मधील मानसी तक्षकबरोबरच्या 'त्या' सीनवर बॉबी देओलने सोडलं मौन, म्हणाला, "मला कोणत्याच प्रकारे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 11:50 AM2023-12-11T11:50:51+5:302023-12-11T11:52:01+5:30

बॉबी देओलने साकारलेल्या अबरार हक या पात्राला हिंसक आणि पत्नीसोबतच्या सीन्समुळे ट्रोल केलं जात आहे. यावर आता पहिल्यांदाच बॉबी देओलने मौन सोडत भाष्य केलं आहे. 

animal movie bobby deol talk about maratial rape scene with mansi takshak in ranbir kapoor film | Animal : 'ॲनिमल'मधील मानसी तक्षकबरोबरच्या 'त्या' सीनवर बॉबी देओलने सोडलं मौन, म्हणाला, "मला कोणत्याच प्रकारे..."

Animal : 'ॲनिमल'मधील मानसी तक्षकबरोबरच्या 'त्या' सीनवर बॉबी देओलने सोडलं मौन, म्हणाला, "मला कोणत्याच प्रकारे..."

'ॲनिमल' या बॉलिवूड चित्रपटाची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. प्रदर्शनाच्या १०व्या दिवशीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसला दणाणून सोडलं आहे. या चित्रपटातील कलाकारांचंही सोशल मीडियावर कौतुक होत आहे. बॉबी देओलने 'ॲनिमल'मधून दमदार कमबॅक केलं आहे. या सिनेमातील त्याचा अभिनय पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. पण, याबरोबरच 'ॲनिमल' चित्रपट काही सीन्समुळे वादाच्या भोवऱ्यातही अडकला आहे. यातील बॉबी देओलने साकारलेल्या अबरार हक या पात्राला हिंसक आणि पत्नीसोबतच्या सीन्समुळे ट्रोल केलं जात आहे. यावर आता पहिल्यांदाच बॉबी देओलने मौन सोडत भाष्य केलं आहे. 

बॉबी देओल 'ॲनिमल'मध्ये मानसी तक्षकबरोबर तिसरं लग्न करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. लग्नानंतर बॉबी देओल तिसऱ्या पत्नीबरोबर जबरदस्ती करतानाच्या सीन्सला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. याबाबत मानसी तक्षकने भाष्य केलं होतं. आता बॉबी देओलने त्याचं मत मांडलं आहे. 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओल म्हणाला, "जेव्हा मी या भूमिकेबद्दल ऐकलं तेव्हा मला माहीत होतं की एकही शब्द न बोलता मी खूप काही करू शकतो. मी अभिनय करायचो तेव्हाही मला कोणत्याच प्रकारे संकोच वाटला नाही." 

"मी फक्त एका क्रूर व्यक्तीची भूमिका साकारली. तो दुष्ट आहे आणि पत्नींबरोबरही चुकीचं वर्तन करतो. तो जसा आहे तसंच मी साकारायचा प्रयत्न केला आहे. तो खरंच त्याच्या तिन्ही पत्नींबरोबर रोमँटिक आहे," असंही पुढे बॉबीने सांगितलं. 

संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना, अनिल कपूर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने १० दिवसांत देशात ४३० कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात ७०० कोटींचा गल्ला जमवला आहे. 

Web Title: animal movie bobby deol talk about maratial rape scene with mansi takshak in ranbir kapoor film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.