'ॲनिमल'मधील बूट चाटण्याच्या वादग्रस्त सीनवर तृप्तीची स्पष्ट भूमिका, म्हणाली, "मी रणबीरच्या भूमिकेत..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 10:17 AM2023-12-08T10:17:16+5:302023-12-08T10:18:02+5:30

माझे बूट चाट! 'ॲनिमल'मधील'त्या' वादग्रस्त डायलॉगवर तृप्तीची प्रतिक्रिया, म्हणाली, "प्रत्येक व्यक्तीची..."

animal tripti dimri reacted on ranbir kapoor controvertial dialog lick my shoes in movie | 'ॲनिमल'मधील बूट चाटण्याच्या वादग्रस्त सीनवर तृप्तीची स्पष्ट भूमिका, म्हणाली, "मी रणबीरच्या भूमिकेत..."

'ॲनिमल'मधील बूट चाटण्याच्या वादग्रस्त सीनवर तृप्तीची स्पष्ट भूमिका, म्हणाली, "मी रणबीरच्या भूमिकेत..."

रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' सिनेमाने प्रदर्शित होताच  बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ॲक्शन आणि ड्रामाने पुरेपूर असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 'ॲनिमल'मधील सीन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सिनेमातील कलाकारांच्या भूमिकेचं कौतुक होत असलं तरी 'ॲनिमल'मधील काही सीन्स आणि डायलॉगमुळे या सिनेमावर टिकाही होत आहे. रणबीर कपूरबरोबरच्या इंटिमेट सीन्समुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी चर्चेत आली आहे. परंतु, या सिनेमात तिने साकारलेल्या भूमिकेमुळे तिलाही ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 

'ॲनिमल'मधील रणबीर कपूरचा वादग्रस्त डायलॉग आणि सीनवर तृप्ती डिमरीने भाष्य केलं आहे. एका सीनमध्ये रणबीर तृप्तीला त्याचे बूट चाटायला सांगतो. 'ॲनिमल'मधील या वादग्रस्त सीनबाबत तृप्तीने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. ती म्हणाली, "अशावेळी मला माझ्या अभिनयाच्या गुरुंनी दिलेली शिकवण आठवते. तुमच्या पात्राचं तुम्ही परिक्षण करू नका. तुम्ही आणि तुमचे सहकलाकार साकारत असलेल्या भूमिका यादेखील व्यक्तीच आहेत. आणि प्रत्येक व्यक्तीची चांगली आणि वाईट बाजू असते. एका कलाकाराने त्याच्या भूमिकेची चांगली आणि वाईट बाजू साकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. पण, जर तुम्ही त्या पात्रांच्या विचारावरुन मतं बनवत असाल, त्याचं परिक्षण करत असाल. तर तुम्ही प्रामाणिकपणे ती भूमिका साकारू शकत नाही. आणि मी हेच लक्षात ठेवते."

पुढे तृप्ती म्हणाली, "मी रणबीरच्या भूमिकेत स्वत:ला ठेवून बघितलं.  एक स्त्री जी त्याच्या मुलांना, वडिलांना आणि संपूर्ण कुटुंबाला मारण्याच्या गोष्टी करत आहे. त्याच्याजागी मी असते तर मी त्या स्त्रीला मारलं असतं. रणबीरचं पात्र एका महिलेला बूट चाटायला सांगतं...पण, नंतर तो तिथून निघुनही जातो. त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. नंतर तो त्याच्या भावंडांना त्या महिलेला जिथे जायचंय तिथे सोडायला सांगतो."

'ॲनिमल'मध्ये रणबीर कपूरबरोबर अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. संदीप वांगा रेड्डी यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर डंका वाजवला आहे. या सिनेमाने सात दिवसांत बॉक्स ऑफिसवर तब्बल ३३८.८५ कोटींचा गल्ला जमवला आहे. 


 

Web Title: animal tripti dimri reacted on ranbir kapoor controvertial dialog lick my shoes in movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.