अनिता कुलकर्णी ह्या मालिकेत साकारणार कडक प्राध्यापिकेची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 06:00 AM2018-11-04T06:00:00+5:302018-11-04T06:00:00+5:30

सोनी सब वाहिनीवर 'मंगलम दंगलम' ही मालिका लवकरच दाखल होणार आहे.

Anita Kulkarni plays the role of a strong professor in this series | अनिता कुलकर्णी ह्या मालिकेत साकारणार कडक प्राध्यापिकेची भूमिका

अनिता कुलकर्णी ह्या मालिकेत साकारणार कडक प्राध्यापिकेची भूमिका

googlenewsNext
ठळक मुद्देअनिता कुलकर्णी चारुलता कुट्टीच्या भूमिकेत

सोनी सब वाहिनीवर 'मंगलम दंगलम' ही मालिका लवकरच दाखल होणार असून या मालिकेत अभिनेत्री अनिता कुलकर्णी चारुलता कुट्टीच्या भूमिकेत
दिसणार आहेत. विनियार्ड फिल्म्सच्या आश्विनी यार्दी यांची निर्मिती असलेली ही मालिका सासरा आणि त्याचा जावई यांच्यामधल्या दंगलीवर भाष्य करते. ही मालिका १३ नोव्हेंबरपासून सोमवार ते शुक्रवार दरम्यान रोज सायंकाळी साडे सात वाजता फक्त सोनी सबवर दाखवला जाईल.


या भूमिकेबद्दल अनिता कुलकर्णी म्हणाल्या की, माझी व्यक्तिरेखा चारुलता कुट्टी या कडक प्राध्यापिकेची आहे. ही घरीही तशीच कडक वागते. मात्र,
एक व्यक्ती म्हणून ती खूप साधी आहे. ती खूप शिस्तीने आयुष्य जगणारी आहे. तिने तिच्या मुलांनाही तसेच वाढवले आहे. 
या मालिकेबद्दल सांगताना अनिता कुलकर्णी म्हणाल्या की, मंगलम दंगलम या मालिकेत सासरा आणि जावई यांच्यात किरकोळ चकमकी आहेत. ही मालिका
एका अत्यंत प्रोटेक्टिव्ह वडिलांबाबत आहे. त्यांना मुलीने लग्न करायलाच नको आहे. मला वाटते हाच यातील सर्वांत छान भाग आहे. कारण, मुलीचे लग्न लावून देऊन तिला आनंदाने संसारात रमलेली बघणे या नेहमीच्या कल्पनेहून हे वेगळे आहे. हे खूप क्वचित दिसते. या मालिकेतील वडिलांना त्यांच्या मुलीशी लग्न करू इच्छिणाऱ्या मुलाबद्दल पक्की खात्री पटायला हवी आहे. हे सासऱ्याचे सर्वोत्तम वैशिष्ट्य आहे.
या माालिकेतील कुटुंब मला खूप आवडले आहे आणि आम्ही एकमेकांसोबत चांगले मिसळून गेलो आहोत. आम्ही एकमेकांच्या इतके जवळ आलो आहोत की केवळ एका मालिकेपुरते आम्ही एकमेकांसोबत आहोत असे वाटतच नसल्याचे अनिता कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: Anita Kulkarni plays the role of a strong professor in this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.