Anjali Arora Diwali Traditional Look: अंजली अरोराचा दिवाळी स्पेशल संस्कारी लूक; नेटकऱ्यांनी मात्र केलं ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 15:47 IST2022-10-26T16:43:41+5:302023-08-08T15:47:58+5:30
MMS लीक प्रकरणामुळे पहिल्यांदा आली होती प्रसिद्धीझोतात

Anjali Arora Diwali Traditional Look: अंजली अरोराचा दिवाळी स्पेशल संस्कारी लूक; नेटकऱ्यांनी मात्र केलं ट्रोल
Anjali Arora Diwali Traditional Look: सोशल मीडिया स्टार अंजली अरोरा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अंजली गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या एका व्हायरल झालेल्या MMS व्हिडिओमुळे नकारात्मक पद्धतीने चाहत्यांच्या चर्चेतील नाव आहे. MSS व्हिडीओमुळे तिची बरीच बदनामी झाली, पण त्याच काळात 'लॉक-अप' या रिअँलिटी शो मुळे ती प्रसिद्धीझोतात आले. तेव्हापासून अंजली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. अनेकदा तिने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे तिला नेटिझन्सच्या ट्रोल करतात. काही लोक तर अंजलीचे फोटो आणि तिचा डान्स आवडला नाही तरीही तिला वाईटरित्या ट्रोल करताना दिसतात. सध्या असा एका दिवाळी स्पेशल व्हिडीओ पाहून ती चाहत्यांच्या टीकेचं लक्ष्य झाली आहे.
अंजली सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने अलीकडेच दिवाळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. तिच्या या व्हिडिओमुळे अंजली पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. MMS स्कँडलनंतर अनेकदा चर्चेत राहणारी 'कच्चा बदाम गर्ल' अंजली अरोरा पुन्हा एकदा नेटिझन्सकडून ट्रोल होताना दिसतेय. सर्वांप्रमाणेच अंजलीने देखील तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर दिवाळीच्या रंगात रंगलेल्या स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये ती पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. पण अंजलीचा हा दिवाळी लूक पाहून, ती दुतोंडी असल्याच्या भावना काहींनी व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून अंजलीला पुन्हा एकदा टीकेला सामोरे जावे लागत आहे.
दिवाळीच्या या व्हिडिओमध्ये, अंजली इतर सेलिब्रिटींप्रमाणेच दिवाळीच्या पूजेनंतर घरात दिवे लावताना दिसत आहे. इतकंच नाही तर व्हिडीओमध्ये ती सलवार कमीझसह लाल रंगाचा दुपट्टा घेऊन व्हिडीओसाठी पोज करताना दिसत आहे. व्हिडिओच्या मागे सलमान खान आणि सोनम कपूर स्टारर 'प्रेम रतन धन पायो' हे गाणे वाजत आहे. तिचा हा व्हिडिओ शेअर करताना अंजलीने लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण सोशल मीडिया यूजर्स तिच्या या पारंपरिक लूकवरही कमेंट करत आहेत. काही जण तर तिच्या व्हिडिओवर कमेंट करून तिची खिल्लीही उडवत आहेत.
अंजलीने व्हिडिओ शेअर करताच लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, MMS स्कँडलनंतर सती सावित्री होऊ नका. त्याचवेळी एकाने लिहिले- आम्ही तुमचा (दुसरा) व्हिडिओ पाहिला आहे. दुसर्याने अंजलीची खिल्ली उडवली आणि लिहिले- 'तुम्ही बाहेर पडू नका, रस्त्यावर फटाके वाजवण्यास बंदी आहे.' याशिवायही लोक त्या व्हिडीओवर विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. मात्र, असे काही लोक आहेत जे त्याच्या लूकचे आणि संस्कारांचे कौतुक करताना दिसतात. इतकेच नाही तर अनेकजणांनी तिला दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.