Anupam Kher Emergency First Look: कंगना राणौतनंतर आता 'इमर्जन्सी'मधला अनुपम खेर यांचा फर्स्ट लूक आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 11:55 AM2022-07-22T11:55:14+5:302022-07-22T11:55:51+5:30
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या 'इमर्जन्सी' (Emergency Movie) चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता निर्मात्यांनी या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या 'इमर्जन्सी' (Emergency Movie) चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. आता निर्मात्यांनी या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. दिवंगत नेते जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत अनुपम खेर दिसणार आहेत.
'इमर्जन्सी' चित्रपटातील अनुपम खेर यांचा फर्स्ट लूक ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh) यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. हे पोस्टर शेअर करताना त्यांनी लिहिले, 'इमर्जन्सीमधील जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत अनुपम खेर यांचा फर्स्ट लूक.
ANUPAM KHER AS JAYAPRAKASH NARAYAN IN 'EMERGENCY': FIRST LOOK... #AnupamKher to essay the part of #BharatRatna#JayaprakashNarayan in #Emergency... #KanganaRanaut portrays #IndiraGandhi in the film... Directed by #KanganaRanaut... #FirstLook poster... pic.twitter.com/fNKYHX4h4y
— taran adarsh (@taran_adarsh) July 22, 2022
इमर्जन्सी चित्रपटातील लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन अनुपम खेर यांनी लिहिले, 'कंगना राणौतने दिग्दर्शित केलेल्या इमर्जन्सी या चित्रपटामध्ये जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारताना अभिनमान आणि आनंद वाटत आहे. जय हो!'
इमर्जन्सी चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा लेखन आणि निर्मिती देखील कंगना राणौतने केले आहे. चित्रपटाचा स्क्रीनप्ले आणि संवाद लेखन हे रितेश शाह यांनी केले आहे. जयप्रकाश नारायण यांनी १९७० च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात विरोधकांचे नेतृत्व केले होते. इंदिरा गांधींच्या हुकूमशाही वृत्तीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांमध्ये जयप्रकाश नारायण हे आणीबाणीतील प्रमुख नेते म्हणून उदयास आले होते.