विवाहित असूनही एकमेकांच्या प्रेमात पडले होते अनुमप खेर आणि किरण खेर, इंटरेस्टिंग आहे त्यांची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 11:44 AM2022-08-26T11:44:46+5:302022-08-26T11:52:24+5:30

किरण व अनुपम यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी अशी आहे, पण लग्न करण्याचा निर्णय दोघांसाठी सोपा नव्हता.कारण दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा दोघेही आधीच विवाहित होते.

Anupam kher Kirron Kher couple celebrating 37th wedding anniversary know about their love story | विवाहित असूनही एकमेकांच्या प्रेमात पडले होते अनुमप खेर आणि किरण खेर, इंटरेस्टिंग आहे त्यांची लव्हस्टोरी

विवाहित असूनही एकमेकांच्या प्रेमात पडले होते अनुमप खेर आणि किरण खेर, इंटरेस्टिंग आहे त्यांची लव्हस्टोरी

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून अनुपम खेर सतत चर्चेत आहेत. त्यांनी अलिकडेच आमिर खान आणि अनुराग कश्यप यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे ते चर्चेत आहेत. आज अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर त्यांच्या लग्नातला फोटो शेअर केला आहे. आज अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या लग्नाचा ३७ वा वाढदिवस त्या निमित्ताने त्यांनी फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे. अनुपम खेर आणि किरण खेरबॉलिवूडमधील एक आयडिल कपलपैकी एक आहेत. दोघेही चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित नावं आहेत. किरण खेर अभिनयासोबतच राजकारणातही सक्रिय आहेत. त्या चंदीगडच्या खासदार आहेत. आज अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे.  पण लग्न करण्याचा निर्णय दोघांसाठी सोपा नव्हता. यानिमित्ताने जाणून घेऊया अनुपम खेर आणि किरण खरे यांची लव्हस्टोरी.


अनुपम व किरण खेर यांची लव्हस्टोरी कुठल्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. दोघांचेही पहिले लग्न अयशस्वी ठरले. पहिल्या लग्नानंतर काही वर्षांनी दोघेही पुन्हा भेटले आणि त्यांनी एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली. १९८५ मध्ये दोघांनीही लग्न केले.

किरण व अनुपम यांची भेट चंदीगडमध्ये झाली होती. दोघेही चंदीगड थिएटर ग्रूपमध्ये काम करायचे. यादरम्यान दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. एका मुलाखतीत किरण यांनी सांगितले होते की, असे काहीही नव्हते जे अनुपमला माझ्याबद्दल ठाऊक नव्हते. त्याच्याबद्दलही मला सगळे काही माहित होते. पण तेव्हा आमच्यात केवळ मैत्री होती. त्यापलीकडे काहीही नव्हते.

१९८० मध्ये किरण चंदीगडवरून मुंबईला आल्या. येथे त्यांची ओळख बिझनेसमॅन गौतम बेरीसोबत झाली. पुढे दोघांनीही लग्न केले. लग्नानंतर वर्षभरातच किरण आई झाली. सिकंदर खेर हा किरण आणि गौतम यांचा मुलगा आहे. सिकंदर चार पाच वर्षांचा असतानाच या लग्नात आपण आनंदी नाही, हे किरण व गौतम दोघांनाही कळून चुकले होते.

तिकडे १९७९ मध्ये अनुपम यांनी कुटुंबाच्या आग्रहावरून मधुमालती नामक मुलीसोबत लग्न केले. पण ते दोघेही आपल्या नात्यात आनंदी नव्हते. याचदरम्यान नादिरा बब्बर यांच्या एका नाटकासाठी किरण व अनुपम दोघेही कोलकात्यात गेले. येथे त्यांची अनेक वर्षांनी पुन्हा भेट झाले. नाटक संपल्यावर अनुपम यांनी किरण यांना प्रपोज केले. आधी तर अनुपम विनोद करताहेत, असे किरण यांना वाटले. पण नंतर आपल्या दोघांचेही एकमेकांवर प्रेम आहे, हे त्यांना कळून चुकले. पुढे दोघेही एकमेकांना भेटू लागले आणि त्यांच्यातील प्रेम वाढत गेले. . यानंतर दोघांनीही आपआपल्या पार्टनरसोबत घटस्फोट घेऊन १९८५ मध्ये लग्न केले. अनुपम यांनी किरण यांचा मुलगा सिकंदर यांना स्वीकारत त्याला आपले नावही दिले.


 

Web Title: Anupam kher Kirron Kher couple celebrating 37th wedding anniversary know about their love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.