अनुपम खेर भेटले सोनाली बेंद्रेला, म्हणाले ती माझी हिरो
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 02:35 PM2018-08-13T14:35:31+5:302018-08-13T14:35:57+5:30
अभिनेते अनुपम खेर नुकतेच सोनालीला भेटले आणि या भेटीनंतर त्यांनी सोनालीला माझी हिरो असे सांगितले. अनुपम खेर यांनी ट्विटरवर सोनालीला भेटल्याचे सांगितले.
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या कॅन्सरवर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. नुकतेच अभिनेते अनुपम खेर सोनालीला भेटले आणि या भेटीनंतर त्यांनी सोनालीला माझी हिरो असे सांगितले. अनुपम खेर यांनी ट्विटरवर सोनालीला भेटल्याचे सांगितले.
अनुपम खेर यांनी ट्विट केले की, मी सोनाली बेंद्रेसोबत काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. आम्ही मुंबईत बऱ्याचदा भेटलो आहे. नेहमी उत्साही असणाऱ्या व्यक्तींपैकी ती एक आहे. गेल्या पंधरा दिवसात मला न्यूयॉर्कमध्ये तिच्यासोबत स्पेशल वेळ व्यतित करण्याची संधी मिळाली. मी सहजतेने म्हणू शकतो की, ती माझी हिरो आहे.
अनुपम खेर यांनी सोनालीचा उपचारासाठी हेअरकट केलेला फोटो शेअर केला आहे.
I have done few films with @iamsonalibendre. We’ve met socially many times in Mumbai. She always has been bright & a very warm person. But it is only in the last 15days that I got the opportunity to spend some quality time with her in NY. And I can easily say,”She is my HERO.”😍 pic.twitter.com/z6iBe2s7fy
— Anupam Kher (@AnupamPKher) August 12, 2018
अनुपम खेर व सोनाली बेंद्रेने ढाई अक्षर प्रेम के, हमारा दिल आपके पास है आणि दिल ही दिल में यांसारख्या सिनेमात काम केले आहे. सध्या अनुपम खेर 'न्यू एम्सटर्डम' या वेबसीरिजचे शूटिंग करत आहेत. तेच सोनाली बऱ्याच कालावधीपासून रुपेरी पडद्यापासून गायब आहे. ती छोट्या पडद्यावर सक्रीय होती. ती झी टीव्हीवरील इंडियाज बेस्ट ड्रामेबाज या शोचे परीक्षण करीत होती. २०१३ सालापासून ती या शोसोबत जोडली होती. मात्र उपचारासाठी तिला हा शो सोडावा लागला. तिच्याजागी या शोसाठी अभिनेत्री हुमा कुरेशीला घेण्यात आले.
सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात सोनालीवर उपचार सुरू आहेत. सोनाली उपाचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे म्हटले जात आहे. सोनालीचे पती दिग्दर्शक गोल्डी बहलने ट्वीट करून तिच्या तब्येतीबाबत सांगितले आहे. सोनालीची तब्येत चांगली असून ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. आम्हाला सगळ्यांना मोठा प्रवास करायचा आहे. सगळे काही ठीक होईल अशी आम्हाला आशा आहे.