स्वत:चं मूल नाही म्हणून अनुपम खेर यांना वाटते खंत, सावत्र मुलगा सिकंदरबद्दल म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 05:55 PM2024-10-21T17:55:59+5:302024-10-21T17:56:54+5:30
सिकंदर खेर हा किरण यांच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे.
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) नेहमी चर्चेत असतात. सिनेमा आणि इतर विषयांवरही ते मत मांडत असतात. अनुपम खेर यांनी अभिनेत्री किरण खेर (Kiroon Kher) यांच्यासोबत लग्न केलं. किरण खेर यांचं हे दुसरं लग्न केलं. पहिल्या पतीपासून त्यांना सिकंदर हा मुलगा होता. अनुपम खेर यांनी मुलासह त्यांना स्वीकारलं. पण स्वत:चं मूल न झाल्याची त्यांना नेहमीच खंत वाटते.
अनुपम खेर यांनी १९८५ साली किरण यांच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांची लव्हस्टोरी चांगलीच चर्चेत होती. तेव्हा किरण यांना सिकंदर हा मुलगा होता. लग्नानंतर अनुपम यांनी सिकंदरला आपलं नाव दिलं. अगदी आपल्याच मुलाप्रमाणे त्याला मोठं केलं. शुभंकर मिश्रा च्या पॉडकास्टमध्ये अनुपम खेर म्हणाले, "स्वत:चं मूल नाही याचा मला आधी काहीच फरक पडायचा नाही. पण मुलाला मोठं होताना बघणं, त्याच्यासोबत पिता पुत्राचं ते बाँडिंग असणं हे मी मिस करतो. गेल्या ७-८ वर्षांपासून मला हे जाणवायला लागलंय. असं नाही की सिकंदरमुळ मला आनंद मिळत नाही पण मी मुलाला मोठं होताना बघू शकलो नाही याचं वाईट वाटतं."
ते पुढे म्हणाले, "मी या प्रश्नाकडे दुर्लक्षही करु शकलो असतो. पण मी असं करत नाहीए. ५०-५५ वर्षांपासून काम करतोय. तेव्हा कामात व्यस्त असल्यामुळे काही समजायचं नाही. पण आता रिकामंपण जाणवतं. याचं आणखी एक कारण म्हणजे सिकंदर आणि किरण त्यांच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे कधी कधी वाटतं की मूल असलं असतं तर त्याच्यासोबत बाँडिंग असती."
किरण राव यांनी अनुपम खेर यांच्यासोबत मुलासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना यात अपयश आलं. मेडिकल हेल्पही घेतली होती मात्र तेही होऊ शकलं नाही. अनुपम खेर यांचंही हे दुसरं लग्न आहे. याआधी त्यांनी अभिनेत्री मधुमती कपूरसोबत लग्नगाठ बांधली होती.