Lok Sabha Elections Result 2024: मतांची आघाडी पाहून अनुपम खेर यांनी कंगनाचं केलं अभिनंदन, म्हणाले, "तुझा हा प्रवास...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 03:47 PM2024-06-04T15:47:40+5:302024-06-04T15:50:24+5:30

अनुपम खेर यांचे कंगनासाठी कौतुकाचे शब्द

Anupam Kher s special post for Kangana Ranaut on her victory in Lok Sabha elections 2024 from Mandi | Lok Sabha Elections Result 2024: मतांची आघाडी पाहून अनुपम खेर यांनी कंगनाचं केलं अभिनंदन, म्हणाले, "तुझा हा प्रवास...'

Lok Sabha Elections Result 2024: मतांची आघाडी पाहून अनुपम खेर यांनी कंगनाचं केलं अभिनंदन, म्हणाले, "तुझा हा प्रवास...'

Lok Sabha Elections Result 2024: लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल हळहळू स्पष्ट होत आहे. मतमोजणी जशी जशी अंतिम टप्प्यात जात आहे चित्र समोर दिसत आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदारसंघातून बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतने (Kangana Ranaut) निवडणूक लढवली. कंगना विजयाच्या जवळ पोहोचली आहे. विरोधात असलेले काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांना तिने लाखभर मतांनी पिछाडीवर टाकलं आहे. कंगनाने पोस्ट शेअर करत मंडीतील जनतेचे आभार मानलेत. तर आता अनुपम खेर (Anupam Kher) यांनीही कंगनासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

अनुपम खेर लिहितात, "माझी प्रिय कंगना. या भव्य विजयासाठी खूप अभिनंदन. तू रॉकस्टार आहेस. तुझा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. मी तुझ्यासाठी आणि मंडीतील जनतेसाठी आनंदी आहे. तू करुन दाखवलंच. जर एखाद्याने लक्ष देऊन काम केलं आणि मेहनत घेतली तर काहीही होऊ शकतं. जय हो!"

अनुपम खेर यांनी कंगनासाठी हे कौतुकाचे शब्द लिहिले. कंगनाच्या आगामी 'इमर्जन्सी' सिनेमात अनुपम खेरही महत्वाच्या भूमिकेत आहेत. कंगनाचा हा विजय पाहून तेही खूप खूश झालेत. बॉलिवूडमध्ये कंगनाला पाठिंबा देणाऱ्या मोजक्या लोकांपैकी अनुपम खेर एक आहेत. 

कंगना बॉलिवूडमध्ये परत जाणार?

पहिल्याच लोकसभा निवडणूकीत कंगनाने भव्य विजय मिळवला आहे. त्यामुळे आता ती जनतेच्या विकासासाठी काम करताना दिसणार आहे. कंगना बॉलिवूडचा निरोप घेऊ शकते अशीही चर्चा आहे. याबाबत आजच दिलेल्या प्रतिक्रियेत तिने सांगितले की मी मंडी सोडून कुठेही जाणार नाही. ही माझी जन्मभूमी आहे. 

Web Title: Anupam Kher s special post for Kangana Ranaut on her victory in Lok Sabha elections 2024 from Mandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.