Laal Singh Chaddha फ्लॉप होताच अनुमप खेर यांनी आमिरला सुनावलं, म्हणाले- "तुम्ही आधी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 01:39 PM2022-08-22T13:39:24+5:302022-08-22T13:55:00+5:30

'लाल सिंग चड्ढा' फ्लॉप होताच अनुपम खेर यांनी आमिर खानवर जोरदार हल्ला चढवला आहे. सिनेमा फ्लॉप झाल्यामुळे आमिरला जबरदस्त धक्का बसला आहे.

Anupam kher takes a dig at Aamir Khan on Laal Singh Chaddhas boycott | Laal Singh Chaddha फ्लॉप होताच अनुमप खेर यांनी आमिरला सुनावलं, म्हणाले- "तुम्ही आधी..."

Laal Singh Chaddha फ्लॉप होताच अनुमप खेर यांनी आमिरला सुनावलं, म्हणाले- "तुम्ही आधी..."

googlenewsNext

Anupam Kher On Aamir Khan: आमिर खानचालाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे अपयशी ठरला . या चित्रपटाद्वारे आमिर खानने 4 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर कमबॅक केले होते, मात्र लोकांनी या चित्रपटाला पूर्णपणे नाकारले. रिलीजपूर्वी या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर बहिष्काराचा ट्रेंडही पाहायला मिळाला. चित्रपट फ्लॉप होण्यामागे हे एक प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. आता लाल सिंग चड्ढाच्या अपयशावर अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी आमिर खानला त्याची जुनी चूक लक्षात आणून देत टोमणा मारला आहे.

 आमिर खानच्या या चित्रपटाच्या फ्लॉपबाबत अनुपम खेर यांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यात त्यांनी अभिनेत्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. इंडिया टुडेला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी बहिष्काराच्या ट्रेंडविषयी आपली प्रतिक्रिया दिली.

अनुपम यांनी इंडिया टुडेला सांगितले की, "तुम्ही पूर्वी काही बोलले असेल, तर त्याचा त्रास तुम्हाला नक्कीच होईल. जर कोणाला वाटत असेल की त्यांनी ट्रेंड सुरू करावा, तर ते तसे करण्यास मोकळे आहेत. ट्विटरवर दररोज नवीन ट्रेंड येत असतात."


आमिरला जबरदस्त धक्का
 दरम्यान बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, आमिर खान आणि त्याची माजी पत्नी किरण राव यांच्या जवळच्या मित्राने सांगितले की, आमिरने या चित्रपटावर खूप मेहनत घेतली होती. पण, प्रेक्षकांनी चित्रपट नाकारल्याने आमिरला जबरदस्त धक्का बसला आहे. चित्रपटाच्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी त्याने स्वतःवर घेतली आहे. यामुळेच त्याने वितरकांचे नुकसान भरुन काढण्याचा निर्णय घेतलाय.

Web Title: Anupam kher takes a dig at Aamir Khan on Laal Singh Chaddhas boycott

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.