कॅटमुळे रणबीरने दिला अनुराग बसूला डच्चू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2017 10:43 AM2017-02-03T10:43:51+5:302017-02-03T10:52:36+5:30

कतरिना कैफच्या उपस्थितीमुळे अभिनेता रणबीर कपूरने अनुराग बसूच्या घरच्या सरस्वती पूजेला हजर न राहणेच पसंत केले.

Anurag Basu dropped by Ranbir for Kat? | कॅटमुळे रणबीरने दिला अनुराग बसूला डच्चू?

कॅटमुळे रणबीरने दिला अनुराग बसूला डच्चू?

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - अभिनेता रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अनुराग बसू हे दोघेही चांगले मित्र आहेत. २०१२ साली आलेल्या 'बर्फी' चित्रपटासाठी एकत्र काम केल्यापासूनच दोघांचे चांगले सूर जुळले आहेत. मात्र आपल्या याच चांगल्या मित्राला रणबीरने माजी प्रेयसी कतरिना कैफमुले डच्चू दिल्याचे समजते. 
दिगर्शक अनुराग बसू दरवर्षी त्याच्या घरी सरस्वती पूजेचे आयोजन करतो आणि रणबीरही पूजेसाठी त्याच्या घरी नेमाने हजेरी लावतो. यावर्षी  मात्र त्याने पूजेला जाणे टाळले. मित्राच्या घरी पूजा आणि रणबीर नाही आला? हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या, दोघांमध्ये काही खटके उडाल्याची चर्चाही सुरू झाली. मात्र त्यांच्यात काहीही प्रॉब्लेम नसल्याचे लगेचच स्पष्टही झाले. रणबीरने अनुरागच्या घरी  जाण्याचे कारण होते कतरिना कैफ.
('जग्गा जासूस'मधील रणबीर कपूरचा नवा फोटो रिलीज)
 
(ऐश्वर्याची मुलगी रणबीर कपूरला समजली बाबा)
(करण जोहर 50 वर्षांचा वैफल्यग्रस्त व्हर्जिन - रणबीर कपूर)
(VIDEO: वाढदिवसाचा मुहूर्त साधत कतरिना कैफची फेसबूकवर एंट्री)
 
 
 
वर्षभरापूर्वी रणबीर -कतरिनाचे नाते संपुष्टात आल्यानंतर ते दोघे एकमेकांसमोर येणेही टाळतात. 'जग्गा जासूस' चित्रपटात ते एकत्र काम करत असले तरीही शॉट संपल्यावर दोघेही लगेच आपल्या व्हॅनमध्ये निघून जातात, एकमेकांशी एक शब्दही बोलत नाहीत. एवढंच काय, ते दोगे चित्रपटाचे प्रमोशनही वेगवेगळे करणार असल्याची चर्चा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरच रणबीर कतरिनाला सतत टाळताना दिसतो. अनुरागच्या घरच्या सरस्वती पूजेसाठी कतरिनाही हजर होती, हे कळताच रणबीरने तिथे न जाण्याचा निर्णय घेतला. आणि त्यामुळेच आपल्या अतिशय चांगला मित्र असलेल्या अनुरागला त्याने डच्चू दिला. 

Web Title: Anurag Basu dropped by Ranbir for Kat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.