मुलीला मिळाली रेपची धमकी; अनुराग कश्यपने स्क्रिनशॉट शेअर करत, मोदींना केला हा सवाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 10:12 AM2019-05-24T10:12:14+5:302019-05-24T10:13:26+5:30
राजकारणापासून सामाजिक मुद्यांवर बेधडक मत मांडणारा अनुराग आपल्या या स्वभावामुळे अनेकदा ट्रोल होतो. पण अनेकदा ट्रोलर्स सर्व मर्यादा ओलांडतांना दिसतात.
अनुराग कश्यप हा परखड बोलणारा दिग्दर्शक़ वास्तववादी चित्रपट बनवणाºया अनुरागच्या चित्रपटांचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. राजकारणापासून सामाजिक मुद्यांवर बेधडक मत मांडणारा अनुराग आपल्या या स्वभावामुळे अनेकदा ट्रोल होतो. पण अनेकदा ट्रोलर्स आपल्या सर्व मर्यादा ओलांडतांना दिसतात. सध्या एका ट्रोलरने अशाच सर्व मर्यादा लांघत अनुरागच्या मुलीला अतिशय अश्लिल भाषेत धमकी दिली आहे.
दरम्यान या ट्रोलरने लिहिलेल्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट शेअर करत, अनुरागने नरेंद्र मोदी यांचे याकडे लक्ष वेधले आहे. माझ्या मुलीला धमक्या देत तुमच्या विजयाचा आनंद साजरा करणा-या समर्थकांशी तुम्ही कसे निपटणार, प्लीज मला सांगा, असे ट्वीट अनुरागने केले आहे.
Dear @narendramodi sir. Congratulations on your victory and thank you for the message of inclusiveness. Sir please also tell us how do we deal with these followers of yours who celebrate your victory by threatening my daughter with messages like this for me being your dissenter. pic.twitter.com/jC7jYVBCi8
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) 23 मई 2019
अनुराग कश्यप अनेकदा मोदी सरकारविरोधात बोलताना दिसतो. त्यामुळे काल गुरुवारी भाजपाला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मोदी समर्थकांनी लगेच अनुरागला ट्रोल करणे सुरु केले. याचदरम्यान स्वत:ला मोदी समर्थक म्हणवणा-या एका युजरने थेट अनुरागच्या मुलीला लक्ष्य करत, तिला अतिशय अश्लिल भाषेत धमकी दिली. अनुरागच्या मुलीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर कमेंट करताना मोदी समर्थक म्हणवणाºया या युजरने धमकीवजा अश्लिल कमेंट लिहिली. अनुरागने या धमकीच्या ट्वीटचे स्क्रीनशॉट शेअर करत, थेट नरेंद्र मोदी यांचे या सगळ्याकडे लक्ष वेधले. नरेंद्र मोदी सर, विजयाच्या शुभेच्छा. पण माझ्या मुलीला धमक्या देत या विजयाचा आनंद साजरा करणा-या तुमच्या समर्थकांशी कसे निपटता येईल. कारण मी तुमचा विरोधक आहे,’असे ट्वीट अनुरागने केले.
Anurag, usually I don't agree with you and am a Namo supporter, I condemn what your daughter is going through.
— Pankaj (@Pankaj57556450) 23 मई 2019
Sir file Police Complaint in Cyber Cell This act is not tolerable
— Manpreet Singh Manni (@ManpritManni) 23 मई 2019
Sir, no sane person will agree with that idiots comments. Modi ko tag karne ke bajay Police complaint karo. Modi Chowkidar hai Hawaldar nahi.— Krishna (@Atheist_Krishna) 23 मई 2019
त्याच्या या ट्वीटनंतर अनेकंदानी त्याला सायबर सेलकडे यासंदर्भात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. तूर्तास अनुराग ‘सांड की आंख’ हा चित्रपट प्रोड्यूस करतो आहे.