#MeToo : पायल घोषविरोधात कायदेशीर कारवाईची तयारी; अनुराग कश्यपचे वकील म्हणाले...
By रूपाली मुधोळकर | Published: September 21, 2020 12:04 PM2020-09-21T12:04:00+5:302020-09-21T12:08:45+5:30
पायलने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुरागवर गंभीर आरोप करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे.
अभिनेत्री पायल घोष हिने लावलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांमुळे दिग्दर्शक व निर्माता अनुराग कश्यप चर्चेत आहे. पायलने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुरागवर गंभीर आरोप करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. माझ्या सुरक्षेस धोका असल्याचे पायलने म्हटले आहे. कालच अनुरागने स्वत:वरचे हे सगळे आरोप नाकारले होते. आज त्याच्या वकीलाने एक स्टेटमेंट जारी करत, अनुरागवरचे लैंगिक गैरवर्तनाचे आरोप खोटे असल्याचा दावा केला.
And here is the statement from my lawyer @PriyankaKhimani .. on my behalf .. thank You pic.twitter.com/0eXwNnK5ZI
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) September 20, 2020
‘माझा अशील अनुराग कश्यप याच्यावर अलीकडे लावण्यात आलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या खोट्या आरोपांमुळे दु:ख झालेय. हे आरोप पूर्णपणे खोटे व निंदनीय आहेत. मीटू मोहिम स्वत:च्या स्वार्थासाठी आणि दुस-याच्या चारित्र्यहननासाठी अशाप्रकारे वापरली जातेय, हे दुर्दैवी आहे. असे खोटे आरोप मीटू मोहिमेला कमकुवत बनवतात आणि ख-या पीडितांना वेदना देतात,’ असे वकीलांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.
अनुराग कश्यपवरील आरोपाबाबत त्याची एक्स-वाइफ आरती बजाजकडून पोस्ट, म्हणाली....
SEE PICS : अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी पायल घोष आहे तरी कोण?
तो अचानक न्यूड झाला...
अनुराग कश्यप याने माझ्यावर जबरदस्ती केली आहे. नरेंद्र मोदीजी, कृपया कारवाई करा. या सर्जनशील व्यक्तिमागील राक्षण देशाला पाहू दे. यामुळे माझे नुकसान होऊ शकते, याची मला कल्पना आहे. माझ्या सुरक्षेला धोका आहे. कृपया मदत करा,’असे ट्विट पायलने केले होते.
झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत पायलने अनुरागने केलेल्या गैरवर्तनाबद्दल सांगितले.
‘अनुरागने मला घरी बोलावले होते. तो स्मोकिंग करत होता़ मी तिथेच बसले होते. काही वेळानंतर त्याने मला दुसºया खोलीत नेले. तिथे त्याची पत्नी कल्की कोचलिनच्या खूप चपला होत्या. ते दाखवत, माझी पत्नी माझ्यावर रागावली आहे, ती अमेरिकेला गेली आहे, असे तो मला म्हणाला. त्यानंतर अनुरागने मला अडल्ट फिल्म दाखवली, तेव्हा मी खूप घाबरले. अचानक तो माझ्यासमोर न्यूड झाला आणि मलादेखील माझे कपडे काढायला सांगितले. मला कन्फर्टेबल वाटत नाही आह, असे मी त्याला म्हटले.
अनुरागनेही नाकारले आरोप
क्या बात है , इतना समय ले लिया मुझे चुप करवाने की कोशिश में । चलो कोई नहीं ।मुझे चुप कराते कराते इतना झूठ बोल गए की औरत होते हुए दूसरी औरतों को भी संग घसीट लिया। थोड़ी तो मर्यादा रखिए मैडम। बस यही कहूँगा की जो भी आरोप हैं आपके सब बेबुनियाद हैं ।१/४
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) September 19, 2020
अनुरागने एकापाठोपाठ एक ट्विट करत पायल घोषच्या आरोपांना उत्तर दिले होते. थोडी तर मर्यादा बाळगा, जे काही आरोप आहेत ते बिनबुडाचे, निराधार आहेत, असे अनुरागने म्हटले होते.
हा सगळा मला फसवण्याचा कट असल्याचा दावा अनुरागने केला होता.
क्या बात है, मला चूप करण्यासाठी इतका वेळ घेतला. काही हरकत नाही. पण मला चूप करण्यासाठी इतके खोटे बोललात की, दुस-या महिलांनाही यात ओढले. थोडी मर्यादा ठेवा मॅडम. मी फक्त एवढेच म्हणेल की, जे काही आरोप आहेत ते सगळे निराधार आहेत, असे ट्विट अनुरागने त्याने केले होते.