OMG! सलमान खानबद्दल हे काय बोलून गेला अनुराग कश्यप !!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 09:22 AM2018-07-16T09:22:57+5:302018-07-16T09:25:34+5:30

दिग्दर्शक भले कितीही उत्तमोत्तम चित्रपट बनवो, पण बॉलिवूडच्या बड्या स्टार्ससमोर टिकाव लागणे, त्याच्यासाठी सोपे नसतेच. खरे तर हे आमचे मत नाहीच. हे मत आहे, निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपचे. 

 Anurag Kashyap talks about Salman Khan | OMG! सलमान खानबद्दल हे काय बोलून गेला अनुराग कश्यप !!

OMG! सलमान खानबद्दल हे काय बोलून गेला अनुराग कश्यप !!

googlenewsNext

दिग्दर्शक भले कितीही उत्तमोत्तम चित्रपट बनवो, पण बॉलिवूडच्या बड्या स्टार्ससमोर टिकाव लागणे, त्याच्यासाठी सोपे नसतेच. खरे तर हे आमचे मत नाहीच. हे मत आहे, निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपचे. अलीकडे एका मुलाखतीत बोलताना अनुरागने याच आशयाचे विचार बोलून दाखवले. मोठे निर्माते आणि मोठे स्टार्स स्वत:च्या रिलीजवेळी अगदी हुकूमशहासारखे वागतात, असे अनुराग म्हणाला.
आपले हे म्हणणे पटवून देण्यासाठी त्याने एक उदाहरणही दिले. २०१२ मध्ये माझा ‘गँग आॅफ वासेपूर’ रिलीज झाला होता. बॉक्सआॅफिवर चित्रपट चांगला चालत होतो. पण दुसऱ्याच आठवड्यात सलमान खानचा ‘एक था टायगर’ आला आणि सलमानचा हा चित्रपट येताच मल्टीप्लेक्स व अन्य चित्रपटगृहांनी माझा चित्रपट काढून टाकला. हे असे एकदा नाही तर अनेकदा झाले आहे, असे अनुरागने यावेळी सांगितले.
सलमानबद्दलही अनुराग या मुलाखतीत बोलला. सलमान व माझ्याबद्दल सांगायचे तर आम्हा दोघांनाही एकमेकांचा स्वभाव आवडत नाही़. हे वास्तव आहे. कदाचित त्याला तर माझ्याकडे पाहणेही आवडत नसावे, असेही अनुराग म्हणाला.
सध्या अनुरागने दिग्दर्शित केलेली ‘सेक्रेड गेम्स’ ही नेटफिक्स ओरिजनलची सीरिज प्रचंड गाजते आहे. यातील वादग्रस्त संवाद, नग्न दृश्ये यावरून या सीरिजवर टीका केली जात आहे.

कल्की कोच्लिनसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अनुराग कश्यप स्वत:पेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीसोबत डेट करतोय. दीर्घकाळापासून अनुरागच्या या रिलेशनशिपची चर्चा होतेय. अनुरागचे वय सध्या ४५ वर्षांचे आहे तर त्याची गर्लफ्रेन्ड शुभ्रा शेट्टी ही केवळ २३ वर्षांची आहे. डिसेंबर २०१५ मध्येच अनुराग व शुभ्राच्या अफेअरच्या चर्चा कानावर आल्या होत्या. दोघेही अनेक इव्हेंटमध्ये एकत्र दिसल्यानंतर या चर्चांना जोर चढला होता. डिझाईनर मसाबा हिच्या संगीत सेरेमनीत स्वत: अनुरागने शु्रभाचा एक फोटो शेअर केला होता. तेव्हापासून अनुराग व शुभ्रा एकमेकांना डेट करत असल्याचे मानले गेले होते. 

 

Web Title:  Anurag Kashyap talks about Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.