‘या’ अभिनेत्रीला सापडला तिचा ‘मिस्टर राईट’, समुद्राकाठी झालेत रोमॅन्टिक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 03:47 PM2019-09-03T15:47:44+5:302019-09-03T15:47:55+5:30
आपल्या बॉयफ्रेन्डसोबतचा एक रोमॅन्टिक फोटो तिने शेअर केला. ‘माझ्या केव्हमॅनसोबतचा संडे नेहमीच खास असतो,’ असे हा फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे.
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपची एक्स-वाईफ कल्की कोच्लिन हिच्या अफेअरच्या चर्चा सध्या जोरात आहेत. आता कल्कीने स्वत: या नात्याचा खुलासा केला आहे. होय, गत रविवारी कल्कीने तिच्या सोशल अकाऊंटवर फोटो शेअर करत, अफेअरच्या चर्चा ख-या ठरवल्यात. आपल्या बॉयफ्रेन्डसोबतचा एक रोमॅन्टिक फोटो तिने शेअर केला.
‘माझ्या केव्हमॅनसोबतचा संडे नेहमीच खास असतो,’ असे हा फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे. या फोटोत कल्ची बॉयफ्रेन्डला किस करताना दिसतेय.
कल्कीच्या या पोस्टवरून तिला तिचा ‘मिस्टर राईट’ सापडला, असे दिसतेय. काही दिवसांपूर्वी कल्कीने बॉयफ्रेन्डसोबत असाच एक फोटो शेअर केला होता.
2009 मध्ये ‘देव डी’ या चित्रपटाच्या सेटवर कल्की दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर 2011 मध्ये दोघांनीही लग्न केले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही. 2015 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला. पण घटस्फोटानंतरही आजही कल्की व अनुराग कश्यप एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
कल्कीला घटस्फोट दिल्यानंतर अनुराग शुभ्रा शेट्टी या त्याच्यापेक्षा 21 वर्षांनी लहान तरूणीच्या प्रेमात पडला. पण कल्की आत्तापर्यंत सिंगल होती. मध्यंतरी ती आणि अभिनेता जिम सर्भ यांच्या अफेअरच्या अफवा उडाल्या होत्या. दोघेही लग्न करणार, असेही म्हटले गेले होते. पण या सगळ्या अफवा सिद्ध झाल्या. आता मात्र कल्कीला तिचे खरे प्रेम मिळाले, असे वाटतेय.
कल्कीला फ्रेंचशिवाय हिंदी, इंग्लिश आणि तामिळ भाषा येतात. सन २००९ मध्ये ‘देव डी’ या चित्रपटातून कल्कीने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. कल्कीचे बॉलिवूड करिअर अनेक चढ-ऊतारांनी भरलेले राहिले. तिच्या करिअरची सुरुवात चांगली झाली. पण तिला म्हणावे तसे यश मिळवता आले नाही. केवळ एक को-अॅक्ट्रेस अशीच तिची ओळख झाली.