नात्यातील विसंवादाचा 'अनुराग'
By Admin | Published: February 27, 2016 03:37 AM2016-02-27T03:37:57+5:302016-02-27T03:37:57+5:30
लग्न, प्रेम, पती-पत्नी या विषयावर आजवर अनेक चित्रपट येऊन गेले. अलीकडच्या काळात प्रेमाची गोष्ट, अजिंक्य, मंगलाष्टक वन्स मोअर, लग्न पाहावे करून अशा अनेक
लग्न, प्रेम, पती-पत्नी या विषयावर आजवर अनेक चित्रपट येऊन गेले. अलीकडच्या काळात प्रेमाची गोष्ट, अजिंक्य, मंगलाष्टक वन्स मोअर, लग्न पाहावे करून अशा अनेक चित्रपटांची उदाहरणं देता येतील. या चित्रपटांतून पती-पत्नीच्या नात्याचे हळुवार पदर उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता 'अनुराग' या चित्रपटातून पती-पत्नीच्या नात्याचा वेगळ्या पद्धतीने विचार करण्यात आला आहे. धर्मेंद्र गोहिल आणि मृण्मयी देशपांडे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. लग्नानंतरच्या एका टप्प्यावर नात्यात होणारी घुसमट, हरवलेलं सहजीवन, नात्यातील विसंवाद, त्यावर त्यांनी काढलेला मार्ग या आशयसूत्रावर 'अनुराग' बेतला आहे. कौटुंबिक विषय मांडताना केवळ दोनच व्यक्तिरेखा चित्रपटात असण्याचा प्रयोगही करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे वेगळा अनुभव ठरणार आहे. आरआरपी कॉर्पोरेशन लिमिटेडने निर्मिती आणि डॉ. अंबरीश दरक यांनी चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन केलेला हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.