अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 11:03 AM2024-11-26T11:03:47+5:302024-11-26T11:04:14+5:30

अनुषाची भूषणसाठी रोमँटिक पोस्ट

anusha dandekar birthday wishes for rumoured boyfriend bhushan pradhan says love you | अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."

अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."

मराठी अभिनेता भूषण प्रधानचे (Bhushan Pradhan) गेल्या काही महिन्यात तीन सिनेमे रिलीज झाले. 'जुनं फर्निचर', 'घरत गणपती', 'ऊन सावली' या चित्रपटांमध्ये भूषणचा अभिनय पाहायला मिळाला. यातील 'जुनं फर्निचर' आणि 'घरत गणपती' विशेष गाजले. जुनं फर्निचर सिनेमात त्याची हिरोईन होती अनुषा दांडेकर. अनुषा आणि भूषणची केमिस्ट्री खूप पसंत केली गेली. इतकंच काय तर दोघंही खऱ्या आयु्ष्यातही एकमेकांना डेट करत असल्याचं समोर आलं. यामुळे चाहतेही खूश झाले. काल भूषणच्या वाढदिवसानिमित्त अनुषाने केलेली पोस्ट आता व्हायरल होत आहे.

भूषण आणि अनुषा हे गोड कपल सध्या प्रसिद्धीझोतात आहे. दोघंही त्यांच्या मित्रपरिवारासोबत दिवाळी साजरी करतानाचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. आता अनुषाने काल भूषणसोबतच्या खास क्षणांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले,"हॅपी बर्थडे भुशी भुशी. आपण दोघंही असंच अॅडव्हेंचर करत राहुया आणि मस्त वेळ घालवूया. येणारं वर्ष सुखसमृद्धीचं आणि जादुई असो. तू खूप टॅलेंटेड आहेस आणि तुझं हे टॅलेंट अख्ख्या जगाने पाहावं यासाठी मी आणखी वाट पाहू शकत नाही. मला नेहमीच हसवल्याबद्दल थँक यू. माझ्या आवडत्या गोष्टी देऊन मला सरप्राईज केल्याबद्दलही खूप आभार. तुझं मन खूप सुंदर आहे, प्रेमळ व्यक्ती आहेस, चांगला मुलगा, भाऊ  आणि मित्र आहेस. तू सगळ्यांवर नितांत प्रेम करतोस आणि त्यामध्ये मीही येते."


मी जशी विचित्र आहे तसाच तू आहे त्यासाठी थँक यू. सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्यासोबत प्रामाणिक राहिल्याबद्दल तू जसा आहे तसाच राहिल्याबद्दलही तुझे आभार. असंच चमकत राहा. मी गेल्या वर्षभरापासूनच तुला ओळखत आहे पण असं वाटतं १०० वर्ष झाले आहेत, ही चांगली गोष्ट आहे का? हाहा...लव्ह यू."

भूषण आणि अनुषा 'जुनं फर्निचर' सिनेमावेळीच एकमेकांच्या प्रेमात पडले. या पोस्टमुळे अनुषाने त्यांचं नातं कन्फर्मच केलं आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत 'आता लग्नच करा' असं म्हटलं आहे. 'दोघं सोबत किती गोड दिसतात' अशाही कमेंट्स आल्या आहेत.

Web Title: anusha dandekar birthday wishes for rumoured boyfriend bhushan pradhan says love you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.