‘बरं झालं लग्न झालं...’; विकी-कतरिनाचं लग्न झालं अन् अनुष्का शर्माची मोठी डोकेदुखी गेली...!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 10:25 AM2021-12-10T10:25:40+5:302021-12-10T10:26:44+5:30
Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding: होय, Anushka Sharmaने कतरिना व विकीला अशा काही हटके शुभेच्छा दिल्यात की, तिच्या शुभेच्छांनी सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. सध्या अनुष्काच्या याच शुभेच्छांची चर्चा आहे.
अखेर कतरिना कैफ (Katrina Kaif) विकी कौशलची (Vicky Kaushal)झाली. होय, काल धुमधडाक्यात विकी व कतरिनाचा लग्नसोहळा पार पडला. लग्नानंतर मिस्टर अॅण्ड मिसेस कौशल मुंबईसाठी रवाना झाले आहेत. लग्नानंतर गुरुवारी संध्याकाळी या दोघांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट्सवर लग्नसोहळ्याचे फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून विकी-कतरिनावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यापैकीच एक.
होय, अनुष्काने कतरिना व विकीला अशा काही हटके शुभेच्छा दिल्यात की, तिच्या शुभेच्छांनी सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. सध्या अनुष्काच्या याच शुभेच्छांची चर्चा आहे.
अनुष्काने कतरिना व विकीला लग्नाच्या शुभेच्छा देत एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. (Anushka Sharma confirmed Katrina-Vicky will be her neighbours)
‘या सुंदर जोडीला खूप खूप शुभेच्छा. तुम्हीदोघे आयुष्यभर एकत्र राहो, तुमच्यात कायम प्रेम राहो, हीच आशा. बरं झालं तुमचं लग्न झालं. आता तुम्ही तुमच्या नवीन घरात राहायला याल व आम्हाला बांधकामाचा आवाज सहन करावा लागणार नाही, याचा आनंद आहे,’अशा आशयाची इन्स्टा स्टोरी अनुष्काने शेअर केली आहे.
या इन्स्टास्टोरीसोबतच कतरिना व विकी अनुष्का व विराटचे शेजारी होणार, यावर शिक्कामोर्तब झालं आहे. लग्नानंतर विकी व कॅट जुहूतील भाड्याच्या घरात राहायला जाणार असून अनुष्का व विराटचे शेजारी होणार आहेत, अशी चर्चा होती. ही चर्चा अनुष्काने खरी ठरवली आहे.
कॅट व विकीने जुहूतील एका अपार्टमेंटमध्ये एक अलिशान फ्लॅट भाड्यानं घेतला आहे. या नव्या घरात विकी व कतरिनाचा नवा संसार सुरू होणार आहे. विकी व कतरिनाने नवा फ्लॅट 60 महिन्यांसाठी भाड्यानं घेतला आहे. याच बिल्डिंगमध्ये अनुष्का व विराटचेही दोन फ्लोर आहेत. विकी व कॅटने नव्या फ्लॅटसाठी सिक्युरिटी डिपॉजिट म्हणून 1.75 कोटींची रक्कम आणि 36 महिन्यांचं भाडं दिल्याचं कळतं. या घराचं भाडं 8 लाख रूपये महिना आहे.