"ते बाळ आमचा अकाय...", विराट कोहलीच्या बहिणीने सांगितले व्हायरल फोटोचे सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 09:58 AM2024-11-26T09:58:33+5:302024-11-26T09:58:53+5:30
व्हायरल फोटोतील मुलगाअकाय आहे की नाही, हे विराट कोहलीची बहिण भावना कोहलीने सांगितले.
Kohli Dhingra Share Post For Akaay : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. अनुष्काने 15 फेब्रुवारी 2024 रोजी अकायला (Akaay) जन्म दिला. अद्याप अकायचा फोटो समोर आलेला नाही. पण, विरुष्काचा लाडका मुलगा नक्की कसा दिसतो हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. अशातच पर्थमध्ये सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटीदरम्यान (Border Gavaskar Trophy 2024) एका मुलाचा फोटो व्हायरल झाला आहे. तो फोटो अकायचा असल्याचा दावा केला जात होता. आता या व्हायरल फोटोचं सत्य थेट विराटच्या बहिणीने सांगितले आहे.
नुकंतच विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध (IND vs AUS) पर्थ येथे सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावले. यावेळी अनुष्कादेखील स्टेडियममध्ये त्याला चिअर करण्यासाठी तिथे होती. अनुष्काच्या बाजूला उभे असलेल्या एका व्यक्तीच्या कडेवरील मुलाचा फोटो समोर आलाय. तो मुलगा अकाय असल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला आणि तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण, तो अकाय आहे की नाही, हे विराट कोहलीची बहिण भावना कोहलीने सांगितले आहे.
विराट कोहलीच्या बहिणीने या बातमीचं खंडन केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मुलगा विराटचा नाही, असं भावना कोहलीने सांगितलं आहे. भावना कोहलीने इन्स्टाग्रामवर लिहिलं की, " 'मी पाहिलं की, विराट आणि अनुष्काच्या मित्राच्या मुलीला अकाय समजत आहेत. पण फोटोत दिसणारे बाळ आमचा अकाय नाही. धन्यवाद".
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली 2017 मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यानंतर 2021 मध्ये अनुष्काने वामिकाला जन्म दिला. त्यानंतर 2024 हे जोडपं अकायचं या जगात स्वागत केलं. अद्याप विराट अनुष्काने त्यांच्या दोन्ही मुलांचे चेहरे दाखवले नाहीत. अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती भारतीय महिला क्रिकेटर झूलन गोस्वामी यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या 'चकदा एक्सप्रेस' (Chakda Xpress) या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात अनुष्का झूलन गोस्वामी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.