अचानकच प्रभासच्या ‘साहो’च्या सेटवर पोहोचली अनुष्का शेट्टी; म्हटले, ‘थोडं जपून’!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 01:27 PM2018-05-03T13:27:01+5:302018-05-03T18:57:01+5:30
‘बाहुबली’ सिरीजनंतर साउथ सुपरस्टार प्रभास संपूर्ण देशात लोकप्रिय चेहरा बनला आहे. त्याच्याविषयीची प्रत्येक बातमी जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. ...
‘ ाहुबली’ सिरीजनंतर साउथ सुपरस्टार प्रभास संपूर्ण देशात लोकप्रिय चेहरा बनला आहे. त्याच्याविषयीची प्रत्येक बातमी जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. कदाचित तुम्हाला आठवत असेल की, ‘बाहुबली-२’नंतर प्रभासला लग्नासाठी तब्बल सहा हजार प्रस्ताव आले होते. परंतु प्रभासने ते सर्व प्रस्ताव नाकारले होते. असो, सध्या प्रभास त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अबुधाबी येथे आहे. तेथून प्रभासविषयीची एक उत्सुकता वाढविणारी बातमी समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘साहो’च्या सेटवरून प्रभासचा एक फोटो लिक झाला होता. ज्यामध्ये तो एका स्टायलिश काळ्या रंगाच्या बाइकवर बसलेला दिसत होता. असे सांगितले जाते की, प्रभासला काही काळापूर्वीच अॅक्शन स्टंट करताना गंभीर दुखापत झाली होती. मात्र अशातही त्याने काही स्टंट्स केले होते. परंतु जेव्हा ही बाब त्याची खास मैत्रीण अभिनेत्री अनुष्का शेट्टीला कळाली तेव्हा ती लगेचच प्रभासला भेटण्यासाठी ‘साहो’च्या सेटवर पोहोचली होती. यावेळी अनुष्काने प्रभासला सल्ला दिला होता की, ‘चित्रपटातील सर्वच स्टंट स्वत: करण्याचा हट्ट करू नये. ज्याठिकाणी गरज आहे, तिथे बॉडी डबलचा आधार घ्यायला हवा. जास्त भयानय स्टंट्स तुझ्या प्रकृतीसाठी धोकादायक ठरू शकतात.’
दरम्यान, अनुष्काच्या मनात प्रभासबद्दल असलेली काळजी बघून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे या दोघांमधील मैत्रीचे नाते खूपच जवळीकतेचे आहे. मध्यंतरी अशाही बातम्या समोर आल्या होत्या की, प्रभास आणि अनुष्का लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. मात्र त्यानंतर या बातम्यांना पूर्णविराम देण्यात आला. खरं तर या दोघांनी जन्मभर एकत्र यावे, अशी त्यांच्या चाहत्यांचीही इच्छा आहे.