'या' कारणासाठी सई मागणार रेशमची माफी ...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 11:18 AM2018-06-25T11:18:37+5:302018-06-25T11:20:58+5:30
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या कालच्या विकेंडच्या भागामध्ये महेश मांजरेकर यांनी सदस्यांना सांगितले आज एलिमनेशन होणार नाही, सगळे सुरक्षित ...
क र्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या कालच्या विकेंडच्या भागामध्ये महेश मांजरेकर यांनी सदस्यांना सांगितले आज एलिमनेशन होणार नाही, सगळे सुरक्षित आहेत. त्यामुळे घरच्यांना खूप आनंद झाला. कालच्या भागामध्ये रेशम सई आणि मेघावर बरीच नाराज असल्याचे दिसून आले. कानगोष्टीच्या खेळामध्ये रेशमने तिचे मत व्यक्त देखील केले. सईकडून झालेल्या चुकीवरून मेघा, शर्मिष्ठा आणि आऊ यांनी बोलून देखील दाखवले कि, ज्याप्रकारे रेशमला ती बोलली ते अयोग्य होते आणि यापुढे असे बोलू नकोस. आज सई रेशमची एका वेगळ्याप्रकारे माफी मागणार आहे. तेंव्हा रेशम सईला माफ करणार का ? आज कोणता टास्क बिग बॉस घरातील सदस्यांना देणार ? कोण घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट होणार ? या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार ? हे बघणे रंजक असणार आहे.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार नॉमिनेशन प्रक्रियेचे कार्य. बिग बॉस या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रियेसाठी एक वेगळा टास्क सदस्यांना देणार आहेत. या आठवड्यातील नॉमिनेशन कार्य जोड्यांमध्ये पार पडणार आहे. या कार्यानिमित्त घरामध्ये चार जोड्या बनवण्यात येणार आहेत. प्रत्येक जोडीला एक कन्टेनर देण्यात येणार आहे, त्या कन्टेनरमध्ये वाळू भरलेली असणार आहे. नॉमिनेशन प्रक्रियेमधून सुरक्षित होण्यासाठी सर्व जोड्यांना इतर जोड्यांच्या कन्टेनरमधील वाळू कमी करायची आहे तसेच आपल्या कन्टेनरमधील वाळू कमी होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आजच्या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये कोणत्या जोड्या नॉमिनेट होणार आणि कोणत्या विजयी हे बघणे रंजक असणार आहे.