मी चुकलोच नाही, विवेक ओबेरॉय 'त्या' ट्विटवर ठाम; बॉलिवूडचं शरसंधान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 10:14 PM2019-05-20T22:14:39+5:302019-05-20T22:18:28+5:30
महिला आयोगाची विवेकला नोटीस; बॉलिवूड कलाकारांची सडकून टीका
मुंबई: मी काहीही चुकीचं केलेलं नाही. मेम शेअर करण्यात गैर काय, असं म्हणत अभिनेता विवेक ओबेरॉयनं त्याच्या ट्विटचं समर्थन केलं आहे. अनेक जण मला माफी मागण्यास सांगत आहेत. माफी मागण्यात मला काहीही गैर वाटत नाही. पण मी काही चुकीचं केलं आहे, असं मला वाटत नाही, असं विवेक म्हणाला. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा पती अभिषेक बच्चन आणि कन्या आराध्या बच्चन सोबतचा फोटो आक्षेपार्ह मजूकरासह वापरल्यानं विवेकाला राष्ट्रीय महिला आयोगानं नोटीस बजावली आहे. बॉलिवूडमधील कलाकारांनीदेखील विवेकवर सडकून टीका केली आहे.
Vivek Oberoi speaks on Sonam Kapoor's reaction to his tweet (on exit polls), "...Aap apni filmon mein thoda kam overact karein aur social media pe thoda kam overreact karein. I've been working in women empowerment for 10 yrs now. I don't think this is hurting anyone's sentiments" pic.twitter.com/pOWAwO29N6
— ANI (@ANI) May 20, 2019
Vivek Oberoi: People are saying apologise, I have no problem in apologising, but tell me what wrong have I done? If I have done something wrong I will apologise. I don't think I have done anything wrong. What's wrong in it? Somebody tweeted a meme and I laughed at it. pic.twitter.com/d7z5362rwr— ANI (@ANI) May 20, 2019
Vivek Oberoi: I don't know why people are making a huge issue out of it. Someone had sent me a meme which made fun of me. I laughed on it&I appreciated the person for his creativity. If someone mocks at you, you should not take it seriously. pic.twitter.com/Ak23Slw8vr
— ANI (@ANI) May 20, 2019
मी केवळ मेम शेअर केलं. त्यावरुन इतका गदारोळ करण्याची गरज काय, अशा शब्दांमध्ये विवेकनं ट्विटचं समर्थन केलं. 'कोणीतरी मला मेम पाठवलं. त्यात माझी खिल्ली उडवण्यात आली होती. मी त्यावर हसलो आणि त्या माणसाच्या सर्जनशीलतेचं कौतुक केलं. कोणीतरी तुमची खिल्ली उडवत असेल, तर तुम्ही ते गांभीर्यानं घ्यायला नको. ज्या व्यक्ती त्या मेममध्ये आहेत, त्यांना कोणतीही अडचण नाही. उगाच काही नेते त्यावरुन वाद निर्माण करत आहेत. त्यांना माझा चित्रपट रोखता आला नाही. त्यामुळे आता त्यांच्याकडून हा प्रयत्न सुरू आहे,' असं विवेक म्हणाला.
V Oberoi: Those in the meme don't have a problem, but everyone else has. Kaam karne jaate hain nahi non-issues ke upar netagiri shuru kar dete hain. Didi put someone behind bars for a meme, people are I be put behind bars too. They couldn't stop my film, now they are trying this. https://t.co/SxQehFDWFe— ANI (@ANI) May 20, 2019
Vivek Oberoi on notices by National Commission for Women & Maharashtra State Commission for Women: I'm waiting for National Commission for Women, State Commission for Women. I'd like to meet them, I'll also like to explain myself because I don't think I have done anything wrong. pic.twitter.com/yeqRFu6B1Y— ANI (@ANI) May 20, 2019
महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर देऊ, असंदेखील त्यानं सांगितलं. 'मी राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोगाच्या नोटिशीची वाट पाहतो आहे. मला त्यांना भेटायला, माझी बाजू स्पष्ट करायला आवडेल. मी काहीही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळे मी स्पष्टीकरण देऊ शकतो', असं विवेकनं म्हटलं.
Haha! 👍 creative! No politics here....just life 🙏😃
Credits : @pavansingh1985pic.twitter.com/1rPbbXZU8T— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) May 20, 2019
विवेकनं केलेल्या ट्विट केलेल्या फोटोत तीन भाग आहेत. ओपिनियन पोल, एक्झिट पोल आणि रिझल्ट असे फोटोचे तीन भाग आहेत. यातील ओपिनियन पोल लिहिलेल्या भागात ऐश्वर्या रॉय बच्चनचा सलमान खानसोबतचा फोटो आहे. तर एक्झिट पोलमध्ये ऐश्वर्याचा विवेकसोबतचा आणि रिझल्टमध्ये पती अभिषेक आणि मुलगी आराध्यसोबतचा फोटो आहे. विवेकच्या या ट्विटवर बॉलिवूडनं टीका केली आहे. अभिनेत्री सोनम कपूर, उर्मिला मांतोडकर, निर्माते मधूर भांडारकर यांनी तोंडसुख घेतलं आहे.