आर्या आंबेकर सॅन फ्रान्सिकोमध्ये करतेय व्हॅकेशन एन्जॉय, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 04:12 PM2024-10-06T16:12:49+5:302024-10-06T16:26:51+5:30

Aarya Ambekar : गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर सध्या अमेरिकेतील सॅन फ्रान्सिकोच्या रस्त्यावर फिरताना दिसते आहे.

उत्तम आवाज आणि सुंदर अभिनय अशा दुहेरी भूमिका साकारणारी लोकप्रिय गायिका, अभिनेत्री म्हणजे आर्या आंबेकर (Aarya Ambekar).

सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या माध्यमातून आर्या प्रकाशझोतात आली. या शोमध्ये केवळ गोड आवाजामुळेच नाही तर तिच्या सौंदर्यामुळेही ती चर्चेत राहिली.

सध्या आर्या आंबेकर सॅन फ्रान्सिकोमधील गोल्डन गेट ब्रिज येथे फिरताना दिसली.

आर्या आंबेकरने सोशल मीडियावर सॅन फ्रान्सिकोमध्ये फिरतानाचे फोटो शेअर केले आहेत.

आर्या आंबेकरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.

आजवर आर्याने अनेक मालिका, चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ती कायमच चर्चेत असते.