अरबाज खानची पत्नी शूराला आहे 8 वर्षांची मुलगी, सावत्र लेकीसोबत नुकताच दिसला अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 12:12 PM2024-07-24T12:12:30+5:302024-07-24T12:13:39+5:30

अरबाज आणि शूरा यांच्यात तब्बल २५ वर्षांचं अंतर आहे.

Arbaaz Khan s wife Sshura has 8 year old daughter the actor was recently spotted with step daughter | अरबाज खानची पत्नी शूराला आहे 8 वर्षांची मुलगी, सावत्र लेकीसोबत नुकताच दिसला अभिनेता

अरबाज खानची पत्नी शूराला आहे 8 वर्षांची मुलगी, सावत्र लेकीसोबत नुकताच दिसला अभिनेता

अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) यावर्षी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला. मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत (Sshura Khan) त्याने लग्नगाठ बांधली. अरबाजला पहिली पत्नी मलायकापासून २३ वर्षांचा मुलगा आहे. पण खूप कमी जणांना माहित असेल की शूरा खानलाही पहिल्या पतीपासून एक 8 वर्षांची मुलगी आहे. नुकतंच अरबाज सावत्र लेकीसोबत लंचला गेलेला दिसला. बापलेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अरबाज खान एका लहान मुलीचा हात धरुन चालताना दिसला. सोबत शूरा खानही होती. दोघांनी मुलीला कारमध्ये बसवलं. या छोट्या मुलीने शाळेचा गणवेश घातल्याचं पाहायला मिळत आहे. नंतर अरबाज आणि शूरा दुसऱ्या गाडीत बसून रवाना झाले.  ही शूरा खानचीच मुलगी असल्याची चर्चा आहे. अरबाज लेकीची खूप काळजी घेताना दिसत आहे. तसंच मुलगीही अरबाजकडे कौतुकाने पाहत आहे. नमस्ते बॉलिवूड पेजवरुन त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी अरबाज आणि शूराचं कौतुक केलं आहे. तसंच अरबाज लेकीची ज्याप्रकारे काळजी घेतोय हे बघूनही त्यांनी अरबाजची प्रशंसा केली आहे. या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 

अरबाज आणि शूरा यांच्यात तब्बल २५ वर्षांचं अंतर आहे. सुरुवातीला खान कुटुंबाचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. मात्र अरबाजसाठी त्यांनी होकार दिला. अरबाज शूराच्या आधी जॉर्जियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र त्यांच्यात ब्रेकअप झालं आणि काही महिन्यातच अरबाज शूरासोबत रिलेशनशिपमध्ये आला होता. अरबाजने वयाच्या 56 व्या वर्षी दुसरं लग्न केल्याने तो ट्रोलही झाला होता. 

Web Title: Arbaaz Khan s wife Sshura has 8 year old daughter the actor was recently spotted with step daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.