प्रेमाची परिभाषा सांगणारा अर्चना फडकेचा 'अबाउट लव्ह'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 12:43 PM2021-12-11T12:43:44+5:302021-12-11T12:44:02+5:30
अर्चना अतुल फडके यांचा पहिला माहितीपट अबाउट लव्ह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
अर्चना अतुल फडके यांचा पहिला माहितीपट अबाउट लव्ह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अबाउट लव्हचे २१व्या मामि मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंग करण्यात आले होते आणि २०१९मध्ये शेफील्ड न्यू डॉक फेस्टिव्हलमध्ये भारताच्या प्रीमियरपूर्वी सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी न्यू टॅलेंट पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अर्चना फडके यांनी अबाउट लव्हच्या आधी २०१४ साली प्लेसबो या माहितीपटाची आणि २०१७ साली रघु रायः अॅन अनफ्रेमेड पोर्टेटचे संकलन केले आहे. त्यानंतर हँडीकॅमने त्यांनी स्वतःच्या कुटुंबाला आणि तिच्या बिल्डिंगमधील तीन पिढ्यांचा दृष्टीकोन अबाउट लव्हमध्ये दाखवला आहे.
याबद्दल अर्चना फडके म्हणाल्या की, मला नेहमीच सभोवतालच्या छोट्या छोट्या गोष्टी आणि त्याला परस्पर पूरक अशा घटना आणि गोष्टींचे निरीक्षण करण्याचे कुतूहूल होते. एक चित्रपट निर्माती आणि जबाबदार नागरिक म्हणून मी 'अबाउट लव्ह'मध्ये माझे घर आणि सदस्यांना घेऊन हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. विशेष बाब म्हणजे सर्वसामान्य आयुष्य जगताना ज्या गोष्टींचा अनुभव आला ते मला या दोन व्यक्तींच्या रुपात रेखाटण्यास मदत झाली. हा संपूर्ण चित्रपट हॅण्डीकॅमवर चित्रीत केला. एका मध्यमवर्गीय कुटुंबाची मार्मिक कथा हँडीकॅमच्या माध्यमातून सहज चित्रीत करता आली.
कुटुंबासोबत माहितीपट शूट करण्याबाबत त्यांनी सांगितले की, कुटुंबातील सदस्यांसोबत शूटिंग करणं सोप्पे आणि कठीण होते. माझ्या कुटुंबाची माहिती मला असल्यामुळे मी या चित्रपटातील पात्र माझ्या जास्त जवळचे होते. परंतु, घरातील गुपित गोष्टी बाहेर पडेल, याचे मनावर दडपण होते. जगासाठी माझी भूमिका ही फिल्ममेकर आणि कुटुंबातील सदस्य म्हणून अशीच होती. हा चित्रपट शूट करण्यासाठी अडीच वर्षे लागली आणि संकलनासाठी दीड वर्षे लागली.
प्रेम हा खूप किचकट विषय आहे. मला वाटते एखाद्याला प्रेम हे समजते. तर एखादा प्रेमाचा वापर स्वतःच्या हेतूसाठी करतो. मला आशा आहे की माझ्या चित्रपटातून किमान एक टक्के तरी प्रेमाचा अर्थ लोकांना समजेल, असे तिने सांगितले. र्चना फडके यांना निर्मितीपेक्षा दिग्दर्शन करणे जास्त सोप्पे वाटते.