अर्चना पुरणसिंगने शेअर केला पतीसोबतचा जुना फोटो, फॅन्सने दिल्या अशा कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 04:52 PM2019-08-31T16:52:41+5:302019-08-31T16:53:54+5:30

अर्चनाने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत आपल्याला तिच्यासोबत परमीतदेखील दिसत आहे.

Archana Puran Singh shares throwback pics of her & hubby Parmeet Sethi from their younger days | अर्चना पुरणसिंगने शेअर केला पतीसोबतचा जुना फोटो, फॅन्सने दिल्या अशा कमेंट्स

अर्चना पुरणसिंगने शेअर केला पतीसोबतचा जुना फोटो, फॅन्सने दिल्या अशा कमेंट्स

googlenewsNext
ठळक मुद्देया फोटोत अर्चना आणि परमीत दोघेही खूप क्यूट दिसत असून यासोबत तिने जब वी मेट... काही गोष्टी कधीच बदलत नाहीत... आमच्या आयुष्यातील सगळेच क्षण आम्ही जपून ठेवले आहे असे कॅप्शन दिले आहे.

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून या कार्यक्रमातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या कार्यक्रमात सुरुवातीच्या काळात आपल्याला नवज्योत सिंग सिद्धूला पाहायला मिळत होते. पण आता त्याची जागा या कार्यक्रमात अर्चना पुरण सिंगने घेतली आहे. अर्चनाने याआधी कॉमेडी सर्कस या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारली होती. याच कार्यक्रमामुळे कपिल शर्माला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या कार्यक्रमाच्या अनेक सिझनचे विजेतेपद त्याने मिळवले होते. कपिलच्या शोमधील अर्चनाचा वावर प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.

अर्चना पुरणसिंगने तिच्या करियरमध्ये आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. अर्चनाचे पती देखील प्रसिद्ध अभिनेते असून ते देखील अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये झळकले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. अर्चनाचे लग्न प्रसिद्ध अभिनेता परमीत सेठीसोबत झाले असून परमीतने दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटात साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अर्चनाने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अर्चना आणि परमीत दोघेही खूप क्यूट दिसत असून यासोबत तिने जब वी मेट... काही गोष्टी कधीच बदलत नाहीत... आमच्या आयुष्यातील सगळेच क्षण आम्ही जपून ठेवले आहे असे कॅप्शन दिले आहे. हा फोटो अर्चना आणि परमीतच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून तुम्ही दोघे एकत्र खूपच चांगले दिसता असे अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितले आहे.

अर्चना आणि परमीत यांची प्रेमकथा देखील खूपच इंटरेस्टिंग आहे. अर्चनाचे पहिले लग्न झालेले होते आणि पतीसोबत विभक्त झाल्यानंतर तिचा प्रेमावरचा विश्वासच उडाला होता. त्याचदरम्यान परमीत अर्चनाच्या आयुष्यात आला. त्या दोघांनी जवळजवळ चार वर्षं लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर लग्न केले. त्या दोघांना दोन मुले असून त्यांच्या सोशल मीडियावर अनेकवेळा त्यांच्या मुलाचे फोटो आपल्याला पाहायला मिळतात.

 

Web Title: Archana Puran Singh shares throwback pics of her & hubby Parmeet Sethi from their younger days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.