तू पॉर्न इंडस्ट्री का जॉइन करत नाहीस?, राखीला नेटीझन्सने दिला सल्ला

By Admin | Published: May 31, 2017 10:47 PM2017-05-31T22:47:51+5:302017-05-31T22:47:51+5:30

राखी सावंत एखाद्या चित्रपटात काम करीत असो अथवा नसो ती नेहमीच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करून चर्चेत असते.

Are not you joining the porn industry ?, The advice given by Rakhee Netsinson | तू पॉर्न इंडस्ट्री का जॉइन करत नाहीस?, राखीला नेटीझन्सने दिला सल्ला

तू पॉर्न इंडस्ट्री का जॉइन करत नाहीस?, राखीला नेटीझन्सने दिला सल्ला

googlenewsNext

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31- राखी सावंत एखाद्या चित्रपटात काम करीत असो अथवा नसो ती नेहमीच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करून चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने चर्चेत राहण्यासाठी स्वत:चाच एमएमएस तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. आता तिने पुन्हा एकदा असाच काहीसा कारनामा केल्याने लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. राखीने नुकतेच बोल्ड फोटोशूट करून त्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमधील राखीचा अवतार बघून यूजर्सनी तिला संतापाच्या भरात चक्क पॉर्न इंडस्ट्री जॉइन करण्याचा सल्ला दिला आहे.
फोटोमध्ये राखी काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये बघावयास मिळत आहे. या ड्रेसवर तिने हेवी ज्वेलरी आणि लाइट मेकअप केला आहे. याव्यतिरिक्तही तिने काही फोटोज शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच डिफरंट आउटफिट्समध्ये बघावयास मिळत आहे. राखीने हे फोटो शेअर करताच यूजर्सनी तिचा समाचार घेतला. अनेकांनी यावर नकारात्मक कॉमेण्ट शेअर करताना तिच्यावर टीका केल्या. एका यूजर्सने सांगितले की, राखीने असे फोटो काढण्यात पीएचडी केली आहे. तर एकाने तिला तू पोर्न इंडस्ट्री का जॉइन करत नाहीस असा सल्ला दिला.
यूजर्सच्या कमेण्टचा सिलसिला अजूनही सुरूच आहे. एका यूजर्सने लिहिले की, जुने फोटोज् टाकू न तुझे तारुण्य परतणार नाही. एकाने ह्यहॉरर लेडी इन द वर्ल्डह्ण असे लिहिले आहे. तर एका यूजर्सने राखीला भारताची पामेला एडरसन म्हणून घोषित करावे असे लिहिले आहे. मंगळवारी शेअर केलेल्या या फोटोला अजूनही नकारात्मक कमेण्ट सुरूच आहेत; मात्र राखी यालाच प्रसिद्धी समजत असल्याने तिच्यात सुधारणा होईल की नाही, हे सांगणे जरा मुश्कीलच म्हणावे लागेल.
सध्या राखी इंडस्ट्रीमध्ये कुठेच दिसत नाही. ब-याच कालावधीपासून एकाही चित्रपटात तिने आयटम सॉँग केलेले नाही. शिवाय छोट्या पडद्यावरूनही ती गायब आहे. अशात ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत राहू इच्छित असल्याने अशाप्रकारचे फोटोज शेअर करीत आहे; मात्र राखीचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना फारसा पसंत येत नसल्यानेच त्यांनी कमेण्टच्या माध्यमातून रोष व्यक्त केला आहे.

Web Title: Are not you joining the porn industry ?, The advice given by Rakhee Netsinson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.