अभिजीत आणि निक्कीमध्ये वादाची ठिणगी, गायक म्हणाला - "तुम्ही लोकांच्या भावनांचा खेळ केलाय"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 10:57 AM2024-09-24T10:57:36+5:302024-09-24T10:59:08+5:30

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे हा खेळ जिंकण्याची सदस्यांमध्ये चांगलीच चढाओढ होत असलेली पाहायला मिळत आहे.

Argument sparks between Abhijeet and Nikki, singer says - "You have played with people's emotions" | अभिजीत आणि निक्कीमध्ये वादाची ठिणगी, गायक म्हणाला - "तुम्ही लोकांच्या भावनांचा खेळ केलाय"

अभिजीत आणि निक्कीमध्ये वादाची ठिणगी, गायक म्हणाला - "तुम्ही लोकांच्या भावनांचा खेळ केलाय"

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे हा खेळ जिंकण्याची सदस्यांमध्ये चांगलीच चढाओढ होत असलेली पाहायला मिळत आहे. सदस्यांनी आपला खेळदेखील बदलला आहे. दरम्यान आजच्या भागात अभिजीत निक्कीला सुनावताना दिसणार आहे. 

'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की आरडाओरडा करत म्हणतेय,"अभिजीतचे चाहत्यांची इच्छा होती की तो कॅप्टन बनेल. पण याने अंकिताला बनवलं". त्यावर निक्कीला उत्तर देत अभिजीत म्हणतोय,"आमच्यात लोकशाही आहे. तुमच्यात हुकुमशाही होती. तुम्ही खेळातही लोकांच्या भावनांचा खेळ केलाय".


निक्की पुढे म्हणतेय,"हे सगळं करुन तुला मला वाईट ठरवायचं असेल... तर आजपासून माझ्यासोबत बोलू नको". 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन आजपासून आणखी रंगतदार होणार आहे. काही दिवसांतच हा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने सर्व सदस्यांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे.

'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेची घोषणा

 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे 'बिग बॉस हिंदी'च्या ग्रँड प्रीमियरची तारीख जाहीर करण्यात आहे. मराठीचा ग्रँड फिनाले आणि हिंदीचा ग्रँड प्रीमियर हा एकाच दिवशी होणार आहे. रितेश देशमुख होस्ट करत असलेला 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा महाअंतिम सोहळा हा येत्या 6 ऑक्टोंबरला होणार आहे. तर  बॉलिवूड अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेला 'हिंदी बिग बॉस'च्या 18 व्या सीझनचा ग्रँड प्रीमियरदेखील 6 ऑक्टोबरलाच रात्री ९ वाजता होणार आहे.

Web Title: Argument sparks between Abhijeet and Nikki, singer says - "You have played with people's emotions"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.