अरिजीत सिंहचा एड शीरनसोबत लंडनमध्ये परफॉर्मन्स, गायलं आयकॉनिक 'परफेक्ट' साँग!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 03:22 PM2024-09-16T15:22:48+5:302024-09-16T15:23:56+5:30

'परफेक्ट' परफॉर्मन्स पाहून चाहत्यांचा एकच जल्लोष

Arijit Singh performs with Ed Sheeran in London sings the iconic Perfect song | अरिजीत सिंहचा एड शीरनसोबत लंडनमध्ये परफॉर्मन्स, गायलं आयकॉनिक 'परफेक्ट' साँग!

अरिजीत सिंहचा एड शीरनसोबत लंडनमध्ये परफॉर्मन्स, गायलं आयकॉनिक 'परफेक्ट' साँग!

एड शीरन (Ed Sheeran) हा सर्वात लोकप्रिय हॉलिवूड गायक आहे. त्याचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत. भारतातही त्याची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. तसंच भारतीयांच्या मनात घर करुन असलेला गायक अरिजीत सिंह (Arijit Singh) आणि एड शीरन दोघंही एकत्र येतात तेव्हाच वेगळीच जादू पाहायला मिळते. नुकतंच लंडनमध्ये दोघांनी एकत्र स्टेजवर परफॉर्म केलं. दोन आवडीच्या गायकांना एकत्र  पाहून चाहते अक्षरश: वेडे झालेत. 

एड शीरनचं आयकॉनिक 'परफेक्ट' हे गाणं सर्वांनाच माहित आहे. या गाण्याची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. एडच्या शीरनच्या प्रत्येक कॉन्सर्टमध्ये हे गाणं लागतंच. भारतीय गायकांसोबत कोलॅब करायचं, परफॉर्म करायची एड शीरनची ही पहिलीच वेळ नाही. त्याचं भारतावरचं प्रेम कायम दिसून आलं आहे. नुकतंच लंडनमध्येअरिजीत सिंहसोबत त्याने परफेक्ट गाणं गायलं. अरिजीतच्या आवाजात हे गाणं ऐकून चाहते अक्षरश: ओरडायला लागले. रसिकांमधून एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. हा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

अरिजीतने एडसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत त्याचे आभार मानले आहेत. "या 'परफेक्ट' मोमेंट साठी आभार" असं त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. 


मार्च महिन्यात एड शीरन भारत दौऱ्यावर आला होता. मुंबईत त्याचा जोरदार परफॉर्मन्स झाला. यावेळी तो शाहरुख खानच्या घरीही गेला होता. तसंच इतर बॉलिवूड सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्ससोबत त्याने व्हिडिओ बनवले. एकंदरच त्याची ही इंडिया टूर लक्षात राहणारी होती.

Web Title: Arijit Singh performs with Ed Sheeran in London sings the iconic Perfect song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.