अर्जुन कपूरने कॉफी विथ करण या कार्यक्रमात त्याच्या रिलेशन स्टेटसबाबत दिली ही कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 09:00 PM2018-11-24T21:00:00+5:302018-11-24T21:00:02+5:30

कॉफी विथ करण या कार्यक्रमात अर्जुनने त्याच्या रिलेशन स्टेटसविषयी सगळ्यांना सांगितले. अर्जुनने या कार्यक्रमाच्या दरम्यान केलेला हा खुलासा ऐकून त्याची बहीण जान्हवी कपूरला देखील प्रचंड धक्का बसला.

Arjun Kapoor reveals he is NOT single, says he is open to marriage Koffee with Karan | अर्जुन कपूरने कॉफी विथ करण या कार्यक्रमात त्याच्या रिलेशन स्टेटसबाबत दिली ही कबुली

अर्जुन कपूरने कॉफी विथ करण या कार्यक्रमात त्याच्या रिलेशन स्टेटसबाबत दिली ही कबुली

googlenewsNext
ठळक मुद्देकॉफी विथ करण ६ या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक करण जोहरने अर्जुनला त्याच्या रिलेशनशिप स्टेट्सविषयी या कार्यक्रमात प्रश्न विचारला. तू सिंगल आहेस की नाही असे विचारले असता मी सिंगल नाहीये असे उत्तर अर्जुनने लगेचच दिले. त्याएवढेच नव्हे तर अर्जुन लवकरच लग्न करणार असल्याची कल्पना देखील या कार्यक्रमाद्वारे त्याने दिली. लग्नासाठी आता तू तयार आहेस का असे करणने विचारले असता अर्जुन म्हणाला, पूर्वी मी लग्न या गोष्टीसाठी तयारच नव्हतो. पण मी आता लग्न करायला तयार आहे. 

अर्जुन कपूर आणि त्याची बहिण जान्हवी कपूर कॉफी विथ करण या कार्यक्रमात झळकणार आहेत. या कार्यक्रमात ते दोघे आपल्या आयुष्यातील अनेक गुपिते त्यांच्या फॅन्सना सांगणार आहेत. या कार्यक्रमाचा यंदाचा सहावा सिझन असून हा सिझनदेखील प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या कार्यक्रमात अर्जुनने त्याच्या रिलेशन स्टेटसविषयी सगळ्यांना सांगितले. अर्जुनने या कार्यक्रमाच्या दरम्यान केलेला हा खुलासा ऐकून त्याची बहीण जान्हवी कपूरला देखील प्रचंड धक्का बसला.

कॉफी विथ करण ६ या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक करण जोहरने अर्जुनला त्याच्या रिलेशनशिप स्टेट्सविषयी या कार्यक्रमात प्रश्न विचारला. तू सिंगल आहेस की नाही असे विचारले असता मी सिंगल नाहीये असे उत्तर अर्जुनने लगेचच दिले. त्याने त्याच्या रिलेशनशिप विषयी खुलासा केल्यानंतर त्याची बहीण जान्हवी कपूरला देखील आश्चर्याचा धक्का बसला. यावर काय बोलावे तिला सुचतच नव्हते. अर्जुनने कबुली दिल्यावर करणने त्याला विचारले की, तुझ्या पार्टनरची तुझ्या कुटुंबियासोबत ओळख कधी करून देणार... यावर माझ्या कुटुंबासमोर आता मी कबूल केलेच असे त्याने सांगितले तर त्यावर मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही गोष्ट कळली असे जान्हवी म्हणाली. 

एवढेच नव्हे तर अर्जुन लवकरच लग्न करणार असल्याची कल्पना देखील या कार्यक्रमाद्वारे त्याने दिली. लग्नासाठी आता तू तयार आहेस का असे करणने विचारले असता अर्जुन म्हणाला, पूर्वी मी लग्न या गोष्टीसाठी तयारच नव्हतो. पण मी आता लग्न करायला तयार आहे. 

मलाईका अरोरा आणि अर्जुन कपूर नात्यात असल्याचे म्हटले जाते. गेल्या काही दिवसांत तर अनेक वेळा त्यांना एकत्र पाहाण्यात आले. पण त्या दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याविषयी कबुली दिलेली नाही. ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या देखील काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. त्यावर देखील या दोघांनी मौन राखणेच पसंत केले होते. पण आता अर्जुनने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी कबुली दिल्यामुळे तो लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: Arjun Kapoor reveals he is NOT single, says he is open to marriage Koffee with Karan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.