दिवसाला 16 कोटी कमवत असतो तर मदत मागितली नसती...! अर्जुन कपूरने ट्रोलर्सला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 11:46 AM2021-04-16T11:46:09+5:302021-04-16T11:46:41+5:30
अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) एका मुलासाठी मदत मागितली आणि नेटक-यांनी अर्जुनला ट्रोल करणे सुरु केले.
अर्जुन कपूर (Arjun Kapoor) त्याच्या सिनेमांपेक्षा मलायका अरोरासोबतच्या त्याच्या रिलेशनशिपमुळेच अधिक चर्चेत असतो. सध्या मात्र त्याची एक पोस्ट चर्चेत आहे. अर्जुनने या पोस्टमध्ये एका मुलासाठी मदत मागितली आणि नेटक-यांनी अर्जुनला ट्रोल करणे सुरु केले. पण अर्जुन गप्प राहणा-यांपैकी नाहीच. त्याने या ट्रोलर्सला असे काही उत्तर दिले की, त्यांची बोलती बंद झाली.
‘हा लहान मुलगा गंभीर आजाराने ग्रस्त आहे. त्याच्या उपचारासाठी पैशाची गरज आहे, प्लीज याची मदत करा,’ अशी पोस्ट अर्जुनने केली. यासोबत अर्जुनने डोनेशन लिंकही शेअर केली. अर्जुनची ही पोस्ट पाहताच काही लोकांनी त्याला ट्रोल करणे सुरु केले. (Arjun Kapoor respond to trollers says i earning 16 crore a day i would not need to post this)
तुला मदत मागण्याची काय गरज? फक्त एक दिवसाची कमाई या मुलावर खर्च कर, मुलाचा जीव वाचेल, असे एका युजरने यावर लिहिले.
भाई, तेरे पास इतना पैसा है. तू डोनेट कर दे. क्या पब्लिक को बोलते रहता है, असे एका युजरने त्याला सुनावले. एका युजरने तर पब्लिसिटीसाठी अशी मदत मागणे बंद कर, अशा शब्दांत अर्जुनला ट्रोल केले. तू स्वत:च या मुलाचे प्राण वाचवू शकतोस. अशा गोष्टी करून स्वत:ची पब्लिसिटी करणे बंद कर, असे या युजरने लिहिले.
अर्जुनने दिले सडेतोड उत्तर
ट्रोलर्सचे कमेंट्स पाहून अर्जुनचा पारा चढला. मग काय, त्याने या ट्रोलर्सला चांगलेच सुनावले़ ‘माझी एक दिवसाची कमाई 16 कोटी असतील तर मला अशी पोस्ट करण्याची गरज पडली नसती. मी 16 कोटींची मदत करू शकत नाही, म्हणून मी पोस्ट केली आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, शक्य ती मदत मी केली आहे. त्याला चांगल्या हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे. मी मदत केलीच. तुम्हीही मला ट्रोल करण्यापेक्षा त्याला मदत करू शकता,’ असे अर्जुनने ट्रोलर्सला सुनावले.
अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तो ‘एक विलेन रिटर्न्स’ या सिनेमात दिसणार आहे. ‘भूत पुलिस’ या सिनेमाही अर्जुनची वर्णी लागली आहे. या हॉरर कॉमेडी सिनेमात अर्जुन, सैफ अली खान, जॅकलिन फर्नांडिस, यामी गौतम मुख्य भूमिकेत आहेत.