अल्लू अर्जुन-रश्मिका मंदानाच्या 'Pushpa 2'मध्ये अर्जुन कपूरची वर्णी?, समोर आली नवीन अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 02:57 PM2022-10-13T14:57:17+5:302022-10-13T14:58:21+5:30

Arjun Kapoor : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर 'पुष्पा २'मध्ये दमदार भूमिकेत दिसणार असल्याचे वृत्त समोर आले होते.

Arjun Kapoor's character in Allu Arjun-Rashmika Mandana's 'Pushpa 2'?, new update revealed | अल्लू अर्जुन-रश्मिका मंदानाच्या 'Pushpa 2'मध्ये अर्जुन कपूरची वर्णी?, समोर आली नवीन अपडेट

अल्लू अर्जुन-रश्मिका मंदानाच्या 'Pushpa 2'मध्ये अर्जुन कपूरची वर्णी?, समोर आली नवीन अपडेट

googlenewsNext

मागील वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज झालेल्या अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) अभिनीत 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. या चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 'पुष्पा: द राइज'ने कोरोना व्हायरसच्या साथीनंतर चित्रपटसृष्टीला दिलासा दिला. जगभरात ३०० कोटींहून अधिक व्यवसाय करून निर्मात्यांना श्रीमंत केले. या चित्रपटाला प्रेक्षकांनीही भरभरून दाद दिली. तेव्हापासून चाहते चित्रपटाच्या सिक्वेलची वाट पाहत आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर 'पुष्पा २'मध्ये दमदार भूमिकेत दिसणार असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र आता या वृत्तात तथ्य नसल्याचे समजते आहे.

'पुष्पा २'च्या निर्मात्यांनी अर्जुन कपूरला चित्रपटात कास्ट करण्याचे ठरवले आहे. लवकरच चित्रपट निर्माते अर्जुनच्या नावाची घोषणा करतील की 'पुष्पा २'मध्ये पोलिसाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याला अधिकृतपणे साइन केले आहे. ही बातमी मीडियात आल्यानंतर अर्जुनचे चाहते खूप खूश झाले होते.

दरम्यान, 'पुष्पा २' आणि अर्जुनशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या वृत्ताला दुजोरा देताना पिंकविलाने सांगितले की, 'अर्जुन पुष्पा २ चा भाग होणार नाही. या महिन्याच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. चित्रपटाचे शूटिंग २० ते ३० तारखेदरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला शूटिंग हैदराबादमध्ये होणार आहे. त्यानंतर जंगल आणि इतर ठिकाणी चित्रपटाशी संबंधित महत्त्वाची दृश्ये शूट होणार आहेत.
'पुष्पा: द राइज' हे मूळ तेलुगूमध्ये चित्रित करण्यात आले होते, त्यानंतर हा चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये डब करण्यात आला.

Web Title: Arjun Kapoor's character in Allu Arjun-Rashmika Mandana's 'Pushpa 2'?, new update revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.