'पॉझिटिव्ह राहणं म्हणजे...', ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन कपूरची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 01:55 PM2024-07-20T13:55:41+5:302024-07-20T13:56:28+5:30
सोशल मीडियावरुन दोघांच्यात बिनसल्याचं स्पष्ट दिसत आहे.
अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहेत. मलायका नुकतीच तिच्या ट्रीपवरुन भारतात परतली. ट्रीपवर असताना तिचा मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो व्हायरल झाला होता. तसंच ब्रेकअपमुळे मलायका सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्टही करत होती. आता अर्जुनही अशाच पोस्ट करताना दिसतोय. अर्जुनची आणखी एक क्रिप्टिक पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
अर्जुन आणि मलायका हे लव्हबर्ड्स एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यांना कायम वयातील अंतरामुळे ट्रोल केलं गेलं. तरी प्रेमाची कबुली देत सगळीकडे हातात हात घालून फिरायचे.आता त्यांच्यात दुरावा आला आहे. सोशल मीडियावरुन दोघांच्यात बिनसल्याचं स्पष्ट दिसत आहे. नुकतंच अर्जुनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यात लिहिले आहे की, "सकारात्मक राहिलं तर गोष्टी चांगल्याच घडतील असं होत नाही. पण गोष्टी कशाही घडल्या तरी तुम्ही शांत असाल हा सकारात्मक राहण्याचा खरा अर्थ आहे."
'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, काही महिन्यांपूर्वीच अर्जुन-मलायकाचं ब्रेकअप झालं . त्यांचं नातं खूप खास होतं आणि यापुढेही त्यांच्या मनात एकमेकांबद्दल स्थान असेल. त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला असून यावर ते कोणतीही प्रतिक्रिया देणार नाहीत."
अर्जुन कपूर लवकरच 'सिंघम अगेन' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तो खलनायकाच्या भूमिकेत आहे. तर दुसरीकडे मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून भारताबाहेर होती. तिने अर्जुनच्या वाढदिवसालाही हजेरी लावली नाही. तसंच अंबानींच्या पार्टीतूनही ती गायब होती.