माझ्या पेन्टिंग खरेदी करा, वीज बिल भरायचे आहे...! अर्शद वारसीचे ट्विट, किडणी विकण्याचीही तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 04:30 PM2020-07-05T16:30:03+5:302020-07-05T16:31:36+5:30

अलीकडे अभिनेत्री रेणुका शहाणे, तापसी पन्नू यांनी वाढत्या वीज बिलाबद्दल संताप व्यक्त केला होता. आता अभिनेता अर्शद वारसी यालाही वीज बिलाने ‘शॉक’ दिला आहे.

arshad warsi has put up his paintings for sale to pay his electricity bill kidneys keeping for the next bill | माझ्या पेन्टिंग खरेदी करा, वीज बिल भरायचे आहे...! अर्शद वारसीचे ट्विट, किडणी विकण्याचीही तयारी

माझ्या पेन्टिंग खरेदी करा, वीज बिल भरायचे आहे...! अर्शद वारसीचे ट्विट, किडणी विकण्याचीही तयारी

googlenewsNext

राज्यात कोरोनाचा कहर वाढतोय. लॉकडाऊनमुळे नोक-या, व्यवसायांवर संकट आले आहे. अशात भरमसाठ वीज बिलाने लोकांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ केली आहे. वीज बिलाचे फुगलेले आकडे पाहून सगळ्यांचेच डोळे पांढरे होण्याची वेळ आलीय. सामान्यांचे सोडा पण सेलिब्रिटीही यातून सुटलेले नाहीत. अलीकडे अभिनेत्री रेणुका शहाणे, तापसी पन्नू यांनी वाढत्या वीज बिलाबद्दल संताप व्यक्त केला होता. आता अभिनेता अर्शद वारसी यालाही वीज बिलाने ‘शॉक’ दिला आहे.
अर्शदला तब्बल 1 लाख 3 हजार 564 रूपयांचे बिल आले आणि तो उडालाच. याबद्दलचा संताप त्याने सोशल मीडियावर व्यक्त केला होता. ‘हायवे लुटारू’ अदानी यांच्याकडून आलेले हे माझे वीज बिल असे म्हणत त्याने आगपाखड केली होती. त्याच्या या ट्विटला अदानी इलेक्ट्रिसिटीने रोखटोक उत्तरही दिले होते. वाढीव बिलाप्रकरणी आम्ही मदतीसाठी तत्पर आहोत. मात्र वैयक्तिक टीका सहन केली जाणार नाही, असे अदानी इलेक्ट्रिसिटीकडून अर्शदला सुनावण्यात आले होते. यानंतर अदानी इलेक्ट्रिसिटीने समस्या सोडवल्याचे सांगत अर्शदने त्यांचे आभार मानणारे ट्विटही केले होते.

पण हे प्रकरण इथेच संपले नाही.  आता अर्शदने बॉम्बे टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या त्याच्या एका मुलाखतीसंदर्भात ट्विट केले आहे. ‘मला वीज बिल भरण्यासाठी पैशांची गरज असल्याने माझी पेंटिग्स खरेदी करा,’ असे  त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. इतकेच नाही तर माझ्या किडण्या मी पुढील बिलासाठी राखून ठेवत असल्याचेही त्याने या ट्विटमध्ये   लिहिले आहे.
 

Web Title: arshad warsi has put up his paintings for sale to pay his electricity bill kidneys keeping for the next bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.