'अफगाणी क्रिकेटपटूसोबतचा साखरपुडा वडील मोडतील', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीनं व्यक्त केली भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 13:09 IST2021-08-23T13:06:23+5:302021-08-23T13:09:45+5:30
बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक राहिलेली टेलिव्हिजन अभिनेत्री अर्शी खान हीचं अफगाणिस्तानातील एका क्रिकेटपटूसोबत लग्न ठरलं आहे.

'अफगाणी क्रिकेटपटूसोबतचा साखरपुडा वडील मोडतील', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीनं व्यक्त केली भीती
बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक राहिलेली टेलिव्हिजन अभिनेत्री अर्शी खान हीचं अफगाणिस्तानातील एका क्रिकेटपटूसोबत लग्न ठरलं आहे. पण अफगाणिस्तानावर आता तालिबान्यांनी कब्जा केलेला असल्यानं तिनं ठरलेलं लग्न आणि साखरपुडा मोडला जाण्याची भीती व्यक्त केली आहे. वडिलांनी निवडलेल्या एका अफगाण क्रिकेटपटूशी माझं लग्न होणार होतं. पण अफगाणिस्तान तालिबानच्या हातात गेल्यानं वडील ठरलेला साखरपुडा मोडू शकतात, असं अर्शी खान हिनं म्हटलं आहे. (Arshi Khan fears for her engagement to Afghan cricketer after Taliban's takeover)
"अफगाणिस्तानच्या एका क्रिकेटपटूसोबत माझं लग्न ठरलं आहे. ऑक्टोबर महिन्यात मी त्याच्याशी साखरपुडा करणार होते. माझ्या वडिलांनीच याला पसंती दिली होती. पण तालिबाननं अफगाणिस्तावर कब्जा केल्यामुळे आम्हाला कदाचित नातेसंबंध तोडावे लागतील", असं अर्शी खान म्हणाली आहे. अर्शीनं त्या क्रिकेटपटूचं नाव जाहीर करण्यास नकार दिला आहे.
"तो माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आहे. वडिलांनीच हे लग्न ठरवलं असून हे पूर्णपणे अरेंज मॅरेज आहे. त्याच्याशी मी संपर्कात होते. आमची चांगली मैत्रीही होती. पण आता कुटुंबीय साखरपुडा मोडण्याची शक्यता आहे. माझे आई-वडील आता भारतीय वर शोधण्याचा विचार करतील असं वाटतं", असंही अर्शी खान म्हणाली.
कोण आहे अर्शी खान?
अर्शी खान टेलिव्हिन रिअॅलिटी शो बिग बॉस-११ मध्ये स्पर्धक होती. तर याच शोच्या १४ व्या सीझनमध्ये तिनं चॅलेंजर म्हणून प्रवेश केला होता. ती याआधी अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्येही झळकली आहे. अर्शी खान हिनं २०१५ साली आपण पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचा दावा केला होता.