'ही' होती नितीन देसाईंची अखेरची इच्छा; व्हॉईस नोटमध्ये केली पूर्ण करण्याची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 10:37 AM2023-08-03T10:37:52+5:302023-08-03T10:37:52+5:30

Nitin desai last wish: नितीन देसाई यांनी व्यक्त केलेल्या अखेरच्या इच्छेमधूनही त्यांचं एनडी स्टुडिओवर असलेलं प्रेम व्यक्त झालं आहे.

art-director-nitin-desai-died-at-his-n-d-studio-in-karjat-latest-update-and-his-last wish | 'ही' होती नितीन देसाईंची अखेरची इच्छा; व्हॉईस नोटमध्ये केली पूर्ण करण्याची विनंती

'ही' होती नितीन देसाईंची अखेरची इच्छा; व्हॉईस नोटमध्ये केली पूर्ण करण्याची विनंती

googlenewsNext

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (nitin chandrakant desai) यांच्या आत्महत्येमुळे कलाविश्वात एकच खळबळ माजली आहे. कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये नितीन देसाई यांच्याशेजारी एक व्हॉइस रेकॉर्डर सापडला. या रेकॉर्डरमध्ये त्यांनी अनेक गोष्टी रेकॉर्ड केल्या असून त्यात त्यांची अखेरची इच्छाही व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या इच्छेवरुन त्यांचं एनडी स्टुडिओवर किती प्रेम होतं हे दिसून येतं.

नितीन देसाई यांनी मृत्यूपूर्वी एक व्हॉईस नोट रेकॉर्ड केली. हा रेकॉर्डर सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यातून अनेक खुलासे होत आहेत. मृत्य़ूपूर्वी नितीन देसाई यांनी चार बिझनेसमॅनची नाव घेतली आहेत. सोबतच त्यांनी त्यांची अखेरची इच्छाही व्यक्त केली आहे.

काय आहे नितीन देसाईंची अखेरची इच्छा?

नितीन देसाई यांनी व्यक्त केलेल्या अखेरच्या इच्छेमधूनही त्यांचं एनडी स्टुडिओवर असलेलं प्रेम व्यक्त झालं आहे. त्यांच्या या इच्छेनुसार, त्यांचे अत्यंसंस्कार याच स्टुडिओमध्ये व्हावेत असं त्यांनी म्हटलं आहे. कर्जतमध्ये नितीन देसाई यांचा मोठा एनडी स्टुडिओ आहे. या स्टुडिओवर त्यांचं प्रचंड प्रेम होतं. याच स्टुडिओसाठी त्यांनी कर्ज काढलं होतं. त्यामुळे आपल्या प्रिय वास्तूमध्येच आपले अंत्यसंस्कार व्हावेत अशी त्यांची इच्छा होती.

दरम्यान, कर्जबाजारी झाल्यामुळे नितीन देसाई यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जातं. नितीन देसाई यांनी एनडीज् आर्ट वर्ल्ड प्रा. लिमिटेड या कंपनीसाठी १८५ कोटी रुपयांचं कर्ज काढलं होतं. हे कर्ज एडलवाइज फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या ईसीएल फायनान्स या कंपनीकडून २०१६ आणि २०१८ या दोन वर्षांत घेण्यात आलं होतं.  परंतु, कर्जाच्या परतफेडीमध्ये जानेवारी २०२०पासून अनियमितता आढळून येऊ लागली. त्यामुळे त्यांच्या स्टुडिओवर जप्तीची कारवाई करण्यात येणार होती.
 

Web Title: art-director-nitin-desai-died-at-his-n-d-studio-in-karjat-latest-update-and-his-last wish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.