कलाकारांमधील अभियंते आणि बँकर्स...
By Admin | Published: September 26, 2015 01:14 AM2015-09-26T01:14:43+5:302015-09-26T01:14:43+5:30
असं म्हटलं जातं की अभिनय हा शिकविला जात नाही, तो अंगभूतच असला पाहिजे. असे असले तरी जगण्यासाठी कोणती ना कोणती पदवी मिळविणे आवश्यक आहे.
असं म्हटलं जातं की अभिनय हा शिकविला जात नाही, तो अंगभूतच असला पाहिजे. असे असले तरी जगण्यासाठी कोणती ना कोणती पदवी मिळविणे आवश्यक आहे. तथापि अभिनय हा नैसर्गिकच असतो. कोणाच्याही मार्गदर्शनाखाली त्याला घासूनपुसून लख्ख केले जाऊ शकते. त्यामुळे सर्व क्षेत्रातील कलाकार बॉलीवूडमध्ये येताना दिसतात. काहींना थिएटरचा अनुभव असतो अथवा त्यांनी अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेले असते. घराणेशाहीचा मोठा वारसा बॉलीवूडला लाभला आहे. त्यामुळे अनेक अभिनेत्यांची मुले, मुली कोणत्याही अभिनयाच्या प्रशिक्षणाविना थेट प्रवेश करतात. याच वेळी असे अनेक लोक आहेत, ज्यांना पदवी घेणे आवश्यक वाटते. अशाच काही बॉलीवूडच्या कलाकारांनी अभियांत्रिकी, एमबीए, बँकिंगची पदवी घेतली आहे. त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात जाण्याऐवजी बॉलीवूडमध्ये येणे पसंत केले.
सोहा
अली खान
राजकन्या असलेली सोहा अली खान ही उच्च विद्याविभुषित आहे. सोहाने नवी दिल्लीमधील ब्रिटीश स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले. नंतर ती आॅक्सफर्ड विद्यापीठात बल्लीओल महाविद्यालयात गेली. तिथे तिने पदवी मिळविली. त्यानंतर लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स आणि राज्यशास्त्रात आंतरराष्ट्रीय संबंधावर पदव्युत्तर पदवी मिळविली. त्यानंतर तिने बँकिंग क्षेत्रात काम केले. नंतर हे क्षेत्र सोडून तिच्या पालकांच्या पसंतीनुसार अभिनयाचे क्षेत्र निवडले.
परिणिती चोप्रा : २००९ च्या जागतिक मंदीचा फायदा सुंदर अशा परिणिती चोप्राला झाला. तिने मँचेस्टर बिझनेस स्कूलमधून बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्स या तीन विषयात पदवी मिळविली. जागतिक मंदीमुळे तिने भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. यशराज फिल्म्समध्ये तिने जनसंपर्क विभागात काम केले. त्याठिकाणी तिला ‘इश्कजादे’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
सोनू सूद
दबंग स्टार असलेल्या
सोनू सूदने खलनायक
म्हणून काम करण्यापूर्वी नागपूरच्या यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींगची पदवी घेतली आहे.
जॉन अब्राहम
आकर्षक शरीरष्टीचा मालक असलेला मॉडेल, अॅक्टर जॉन अब्राहमने मुंबई एज्युकेशनल ट्रस्टमधून एम.बी.ए.ची पदवी मिळविली आहे. अगोदर जाहिरात क्षेत्रात, नंतर मॉडेल, अभिनेता आणि आता निर्माता म्हणून तो काम करतो आहे.
अश्विनी भावे करणार पंतप्रधानांचे स्वागत
कॅलिफोर्नियामध्ये २७ सप्टेंबरला एसएपी सेंटर येथे होणाऱ्या रिसेप्शनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत मराठमोळी अभिनेत्री अश्विनी भावे करणार आहेत. याबद्दल त्या सांगतात, मोदी म्हणजे भारतामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारी व्यक्ती आहे, ज्याची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता. अशा व्यक्तीचे स्वागत करणे हे मी माझे भाग्य समजते.
सिद्धार्थ : ‘रंग दे बसंती’ फेम सिद्धार्थने मुंबईच्या एस. पी. जैन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अँड इकॉनॉमिक्समधून एम.बी.ए. ची पदवी मिळविली. शैक्षणिक कारकीर्दीत तो आॅलराऊंडर म्हणून ओळखला जायचा. कॉलेजमध्ये असताना त्याने अनेक आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग घेतला.
नागार्जुन
मुळचा अभियंता असणाऱ्या नागार्जुन याने गिंडीमधील अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी मिळविली. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना तो इस्टर्न मिशिगन विद्यापीठात गेला आणि त्याने अॅटोमोबाईल इंजिनिअरींगमधून एम. एस. केले. नंतर नागार्जुन अभिनेता, निर्माता झाला. त्याचप्रमाणे दूरचित्रवाणी कार्यक्रमात सहभाग घेतला.
के. के. मेनन
बॉलीवूडचा एक चांगला अभिनेता म्हणून ओळख असलेल्या के. के. मेनन याने पुणे विद्यापीठात मॅनेजमेंट सायन्सेसमधून एम. बी. ए. ची. पदवी मिळविली. मार्केटिंग हा त्याचा प्रमुख भाग होता.
शंकर महादेवन : गायन क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी शंकर महादेवनने सॉफ्टवेअर इंजिनिअरची पदवी घेतली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शंकरने मुंबईच्या रामराव आदिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॉम्प्यूटर आणि सॉफ्टवेअर अभियांत्रिकीची पदवी मिळविली. ओरॅकलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून त्याने काम केले आहे.
शिल्पाने नाकारली आॅफर
शिल्पा शेट्टी सध्या फिटनेस विषयावर एक पुस्तक लिहीत आहे. तिच्याशी एका आंतरराष्ट्रीय लाईफ स्टाईल चॅनल वर टॅव्हलिंग शो होस्ट करण्यासाठी संपर्क करण्यात आला होता. फ्रान्स, टोक्यो, मेक्सिको, स्पेन येथील पारंपारिक फॅशन चित्रीत करणे ही शोची संकल्पना आहे. घरापासून दूर रहावे लागेल म्हणून तिने ही आॅफर नाकारली.
नो टू ‘बीबी ९’
‘कैसी ये यारियाँ’ तील अभिनेत्री निती टेलरला ‘बिग बॉस ९ ’ साठी विचारण्यात आले होते. पण तिने ती आॅफर नाकारली. पार्थ समथान्स याने अचानकपणे शो सोडला. युवराज ठाकूर शोमध्ये मॅडीची भूमिका करत आहे. युवराजने अचानक बिग बॉस साठी शो सोडला. ती म्हणाली,‘ मी ऐकलंय पण, जाणार नाही.