‘अज़हर’चे कलाकार झाले गायब
By Admin | Published: May 6, 2016 01:39 AM2016-05-06T01:39:22+5:302016-05-06T01:39:22+5:30
क्रिकेटर अज़रुद्दीनच्या आयुष्यावर आधारित ‘अज़हर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामुळे काही पूर्वक्रिकेटर ‘अज़हर’च्या निर्मात्यांना कोर्टात खेचणार असल्याच्या बातम्या
क्रिकेटर अज़रुद्दीनच्या आयुष्यावर आधारित ‘अज़हर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामुळे काही पूर्वक्रिकेटर ‘अज़हर’च्या निर्मात्यांना कोर्टात खेचणार असल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून मीडियामध्ये येत होत्या. पण आता एक वेगळीच बातमी येत आहे. या चित्रपटातील काही अभिनेते सध्या गायब असल्याची चर्चा आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आल्यापासून अभिनेता करणवीर शर्मा आणि अभिनेता मनजोत सिंग हे सोशल मीडियापासून दूर आहेत. तसेच ते कोणाच्या फोनलाही उत्तर देत नाहीत. हे दोघेही या चित्रपटात अज़हरच्या टीममधील क्रिकेटर्सची भूमिका साकारत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी ते चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजर राहणार होते. पण अचानकच त्यांनी तिथे न जाण्याचा निर्णय घेतला. यावर या चित्रपटाचे दिग्दर्शक टोनी डिसोझा यांचे म्हणणे आहे की, ‘‘करणवीर आणि मनजोत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार होते, ही बातमी खरी आहे. पण आमचा विश्वास आहे की, ते दोघे नक्कीच कोणत्यातरी गोष्टीत अडकले असणार. त्यामुळेच त्यांना कार्यक्रमाला हजर राहाणे शक्य झाले नाही. तसेच ते दोघेही अतिशय प्रोफेशनल आहेत. खरंच कामात व्यग्र असल्याशिवाय ते फोन उचलणे टाळणार नाहीत.’’ क्रिकेटविश्वात झालेल्या मॅच फिक्सिंगच्या स्ंिटग आॅपरेशनमुळे सगळे जग हादरले होते.
‘अज़हर’ या चित्रपटामुळे त्या सगळ्यांची नावे अनेक वर्षांनंतर पुन्हा घेतली जातील अशी जणू धास्तीच त्यांच्या मनात बसलेली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्येही पूर्वक्रिकेटर्सच्या नावाच्या जर्सी पाहायला मिळत आहेत. या पोस्टरनंतर अनेक प्रसिद्ध क्रिकेटर्सनी निर्मात्यांना भेटून या चित्रपटातील त्यांची व्यक्तिरेखा कशा प्रकारे दाखवली आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण तरीही हा चित्रपट अद्याप क्रिकेटजगतातील कोणत्याही सेलीब्रेटीला दाखवण्यात आलेला नाही. या चित्रपटात अतिशय प्रसिद्ध पण तितक्याच वादात अडकलेल्या कप्तानाचे आयुष्य पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामुळे जगाला हादरवून सोडणारे मॅच फिक्ंिसग प्रकरण पुन्हा लोकांमध्ये ताजे होणार आहे. या सगळ्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर एक धमाका होणार हे नक्कीच आहे. चित्रपट पाहिल्यावरच या जाळ्यात कोण अडकलेय आणि यातून कोणाची सुटका झाली हे कळेल.