‘दगडी चाळ’च्या पोस्टरवर अरुण गवळी

By Admin | Published: September 16, 2015 02:54 AM2015-09-16T02:54:26+5:302015-09-16T02:54:26+5:30

सध्या एका चित्रपटाच्या पोस्टरवर झळकणाऱ्या फोटोची चर्चा चांगलीच रंगली आहे. ८०-९०च्या दशकात उसळलेल्या गँगवॉरवर आधारित ‘दगडी चाळ’ हा चित्रपट येत आहे.

Arun Gawali on 'Dabdi Chaw' ​​poster | ‘दगडी चाळ’च्या पोस्टरवर अरुण गवळी

‘दगडी चाळ’च्या पोस्टरवर अरुण गवळी

googlenewsNext

सध्या एका चित्रपटाच्या पोस्टरवर झळकणाऱ्या फोटोची चर्चा चांगलीच रंगली आहे. ८०-९०च्या दशकात उसळलेल्या गँगवॉरवर आधारित ‘दगडी चाळ’ हा चित्रपट येत आहे. चंद्रकांत कानसे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला होता़ त्यात ‘डॅडी’ या प्रमुख भूमिकेच्या चेहऱ्याचा एक भाग मांडीवरील हातामुळे झाकला गेला आहे आणि डोक्यावर गांधी टोपी व लांब पिळदार मिश्या असा अविर्भाव दाखविण्यात आला आहे़ मात्र, हा चेहरा अद्यापही गुलदस्त्यातच ठेवण्यात आला आहे.
ही व्यक्ती कोण असेल, याचे अनेक तर्कवितर्क लढविण्यात आले. अनासपुरे आणि देशपांडे अशा ‘मकरंद’ नावांचीही चर्चा घडली. पण आता एक नवीनच शक्कल लढविण्यात आली असून, एकेकाळचा कुख्यात गँगस्टर जो नुकताच तुरुंगातून बाहेर आला आहे, त्याचा फोटो ‘दगडी चाळ’च्या पोस्टरवर टाकण्यात आला आहे. प्र्रत्येक चित्रपट यशस्वी अथवा प्रदर्शित करण्यासाठी वेगवेगळ्या ‘ट्रिक्स’ आजमावल्या जातात. काही जण एखाद्या कलाकाराची भूमिका जाणूनबुजून गुलदस्त्यात ठेवून चित्रपटाचे प्रमोशन करतात आणि मग हुकमी एक्का बाहेर काढत ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर’प्रमाणे सोशल नेटवर्किंग साईट्सवर त्यांचा वापर करतात. हे पोस्टर त्याचे उत्तम उदाहरण. याला म्हणतात ‘मार्केटिंग फंडा’.

Web Title: Arun Gawali on 'Dabdi Chaw' ​​poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.