Aryan Khan Arrest Updates : KRK ची भविष्यवाणी; म्हणाला, "फरदीन खानप्रमाणे आर्यन खानचही केसही तशीच बंद होईल"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 02:26 PM2021-10-05T14:26:25+5:302021-10-05T14:28:04+5:30
Aryan Khan Arrest Updates :KRK व्हिडीओ शेअर करत यावर केलं भाष्य. ड्रग्स प्रकरणी आर्यन खान याला करण्यात आलीये अटक.
मुंबई क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. एनसीबीने आर्यन आणि इतर आरोपींची सोमवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. दरम्यान. या प्रकरणी कमाल आर खान म्हणजे KRK यानं एक व्हिडीओ शेअर करत त्याला अटक कशी झाली आणि या केसमध्ये पुढे कोणते पैलू येऊ शकतात याबाबत सांगितलं आहे. यापूर्वी अनेकदा त्यानं अनेक प्रकरणांवर भाष्य केलं आहे. तसंच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या केआरकेनं अनेक कलाकारांशीही पंगा घेतला आहे.
"एनसीबीनं आर्यन खानशिवाय अन्य सात जणांना अटक केली आहे. त्यांना एनडीपीएस काय १९८५ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. आर्यन हा त्या क्रुझ पार्टीचा ब्रँड अँबेसेडर होता. परंतु ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यापूर्वी संबंधिताची परवानगी आवश्यक असते आणि त्यानुसार आर्यन खानचीही परवानगी घेण्यात आली असेल. त्यानं शाहरूख खानला याबाबत विचारल्यानंतर त्यानंही याची परवानगी दिली असेल. जेव्हा या रेव्ह पार्टीच्या तिकिट विक्रीची सुरूवात झाली तेव्हाच एनसीबीनं आर्यन खानला अटक करण्याची योजना आखली," असं केआरकेनं व्हिडीओमध्ये नमूद केलं.
"यापूर्वी फरदीन खानलाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवस तुरूंगात राहिल्यावर त्यानं यापुढे असा प्रकार होणार नसल्याचं सांगतल माफी मागितली. त्यानंतर ती केसबंद झाली आमि सर्वांना सोडण्यात आलं. आर्यन खानचीही केस अशीच न्यायालयात जाईल आणि त्यावेळी तो अशीच माफी मागेल आणि ही केस बंद होईल," असंही तो म्हणाला.
अदालत ने आज #AryanKhan को 7 अक्टूबर तक NCB की custody में भेज दिया है! अदालत का फ़ैसला सही ही होगा! उस पर टिप्पणी तो नहीं की जा सकती! लेकिन ये ज़रूर कहा जा सकता है, कि यह फ़ैसला अजीब ज़रूर था! क्योंकि Aryan पर जो धाराएँ लगी है, वो सब ज़मानती धाराऐं हैं!
— KRK (@kamaalrkhan) October 4, 2021
"न्यायालयानं आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत पाठवलं आहे. न्यायालयाचा हा निर्णय़ योग्यच असेल. त्यावर कोणतंही वक्तव्य केलं जाऊ शकत नही. परंतु हे सांगता येईल की तो निर्णय अजब होता. कारण त्याच्यावर लावण्यात आलेली सर्व कलमं जामिनपात्र होती," असंही केआरकेनं ट्वीट करत म्हटलं आहे.