आर्यन ‘मन्नत’वर परतला, शाहरूख खान सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 01:22 PM2021-10-31T13:22:49+5:302021-10-31T13:24:01+5:30
मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) जामीन मिळाला आणि शाहरूख खानच्या (Shah Rukh Khan) जीवात आला. आर्यनच्या सुटकेमुळे सध्या मन्नतवर आनंदाचं वातावरण आहे.
मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) जामीन मिळाला आणि शाहरूख खानच्या (Shah Rukh Khan) जीवात आला. आर्यनला अटक झाल्यापासून बाप म्हणून शाहरूख ‘बेहाल’ झाला होता. अगदी रात्रीची झोप विसरला होता. जेवण सोडून कॉफीवर कॉफी पोटात रिचवून मुलाच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होता. आर्यन जेलमधून बाहेर आल्यावर त्याच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहू लागलेत ते म्हणूनच. आता आर्यनच्या सुटकेनंतर शाहरूच सिद्धीविनायकाच्या दर्शनाला जाणार असल्याचं कळतंय.
दरवर्षी मन्नतवर गणेशोत्सव साजरा होता. दरवर्षी घरच्या गणेशोत्सवाचा फोटो शाहरूख न चुकता सोशल मीडियावर शेअर करतो. बाप्पाच्या आशीर्वादाने आर्यन जेलमधून बाहेर आला, त्यामुळे त्याचे आभार मानण्यासाठी शाहरूख सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाणार असल्याचे कळतेय. जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने ‘इंडिया टुडे’ने याबाबतचे वृत्त दिलं आहे.
गेले २८ दिवस हे आर्यन खानसाठी एखाद्या भयावह स्वप्नापेक्षा कमी नव्हते. तुरूंगातील ते कठीण दिवस आर्यन आयुष्यभर विसरू शकणार नाही. विषयाचं गांभीर्य समजून घेऊन शाहरूख खान आणि गौरी खान त्याच्यासाठी खास रूटीन प्लॅन तयार केला आहे. इतक्या कमी वयात तुरूंगात जाणे, वादात सापडणे...कुणाच्याही मानसिक स्थितीवर प्रभाव पाडू शकतं. त्यामुळे आर्यन खानचं लाइफ बॅक टू नॉर्मल करण्यासाठी किंग खान आणि गौरी खान खास तयारी करत आहे. जेणेकरून आर्यन खान तुरूंग आणि ड्रग्स केसच्या ट्रॉमातून लवकर बाहेर येईल.
बॉलिवूड लाइफ वेबसाइटच्या एका रिपोर्टनुसार, आर्यन खानला अनेक हेल्थ चेकअपमधून जावं लागणार आहे. आर्यनचं न्यूट्रिशन आणि त्याच्या चांगल्या डाएटवर पूर्ण लक्ष दिलं जाणार आहे. त्याला काही ब्लड टेस्टही कराव्या लागणार आहेत. तुरूंगात राहिल्याने त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. कारण आर्यनने तुरूंगात व्यवस्थित जेवणंही केलं नव्हतं. अशात आई गौरीला मुलाच्या आरोग्याची काळजी आहे.
फिजिकल चेकअपशिवाय, आर्यनच्या मेंटल हेल्थवरही खास लक्ष दिलं जाणार आहे. शाहरूख खान आणि गौरी खानने मुलासाठी काउन्सेलिंगचा प्लॅन केला आहे. जेणेकरून तो आपल्या जीवनाच्या त्या चॅप्टरमधून बाहेर पडावा, ज्याने त्याला आतून तोडलं आहे.