Aryan Khan Drugs Case : तुमची मुलं तुरुंगात जातील तेव्हाच..., बॉलिवूड गप्पगार, मिका सिंगला आला राग...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 12:51 PM2021-10-26T12:51:42+5:302021-10-26T12:52:04+5:30

Mumbai Cruise Aryan Khan Drugs Case: आर्यन प्रकरणावरून मिका सिंग संतापला, वाचा काय म्हणाला

Aryan Khan Drugs Case mika singh reacts on bollywood celebs silence over aryan khan arrest case | Aryan Khan Drugs Case : तुमची मुलं तुरुंगात जातील तेव्हाच..., बॉलिवूड गप्पगार, मिका सिंगला आला राग...!!

Aryan Khan Drugs Case : तुमची मुलं तुरुंगात जातील तेव्हाच..., बॉलिवूड गप्पगार, मिका सिंगला आला राग...!!

googlenewsNext
ठळक मुद्दे आर्यन केसवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान ( Aryan Khan Drugs Case) प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. आर्यन खान सध्या तुरुंगात आहे. आज पुन्हा एकदा आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मुलाला जामीन मिळावा यासाठी शाहरुख खान रात्रंदिवस प्रयत्न करतोय. अशात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी शाहरूखच्या पाठिशी उभे झाले आहेत. अर्थात अजूनही अनेकांनी या मुद्यावर मौन बाळगलं आहे. आर्यन प्रकरणावर चुप्पी साधणा-या या सेलिब्रिटींना बॉलिवूड सिंगर मिका सिंगने (Mika Singh) चांगलंच सुनावलं आहे.
‘शाहरुख खानने चित्रपटसृष्टीत हजारो लोकांना नोक-या दिल्या आहेत. इंडस्ट्रीतल्या प्रत्येक कायार्साठी तो नेहमीच मदत करत असतो आणि आज त्याच इंडस्ट्रीतली माणसं त्याच्या कठीण काळात मूग गिळून गप्प आहेत. हे किती लज्जास्पद आहे,’ या आशयाचे ट्वीट संजय गुप्ता यांनी केलं आणि मिका सिंगने संजय गुप्ताचं हे  ट्वीट लगेच रिट्वीट करत आपला संताप व्यक्त केला.

 ‘तुमचं अगदी बरोबर आहे. सर्वजण फक्त तमाशा बघत आहेत. कुणी एकही शब्द बोलायला तयार नाही. माझा शाहरुख खानला पाठिंबा आहे. आर्यन खानला जामीन मिळायला हवा. कदाचित इंडस्ट्रीमधील प्रत्येकाची मुलं  तुरुंगात जातील, तेव्हाच सर्वजण एकत्र येतील,’ असं मिका सिंग आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला.
दरम्यान आर्यन केसवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. गेल्या सुनावणीत आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायाधीश एन डब्लू सांब्रे यांच्या सिंगल बेंचसमोर याचिका दाखल केली होती आणि त्यावर तत्काळ सुनावणी केली जावी अशी मागणी केली होती. दरम्यान एनसीबीकडून बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी एका आठवड्याचा कालावधी मागितला होता. यानंतर सांब्रे यांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 26 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली होती.

Web Title: Aryan Khan Drugs Case mika singh reacts on bollywood celebs silence over aryan khan arrest case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.