Aryan Khan Drug Case: आर्यन खानला ‘सदमा’, तेव्हापासून बराकीच्या एका कोपऱ्यात नुसता बसून आहे  ‘स्टारपुत्र’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 11:01 AM2021-10-21T11:01:23+5:302021-10-21T11:01:50+5:30

Aryan Khan Drug Case Bail Updates : काल जामीन नाकारल्याचा निर्णय ऐकून अशी झालीय शाहरूख खानच्या लेकाची अवस्था

Aryan Khan Reaction After Mumbai Special Court Once Again Rejected His Bail Plea In Mumbai Cruise Drugs Case | Aryan Khan Drug Case: आर्यन खानला ‘सदमा’, तेव्हापासून बराकीच्या एका कोपऱ्यात नुसता बसून आहे  ‘स्टारपुत्र’

Aryan Khan Drug Case: आर्यन खानला ‘सदमा’, तेव्हापासून बराकीच्या एका कोपऱ्यात नुसता बसून आहे  ‘स्टारपुत्र’

googlenewsNext
ठळक मुद्देआर्यनला मुंबईच्या आर्थर रोड तुरूंगात ठेवण्यात आलं आहे. अन्य  कैद्यांसारखा तो राहतोय.

‘स्टारपुत्र’ आर्यन खान (Aryan Khan) याला काल पुन्हा एकदा जामीन नाकारला गेला. आर्यनच्या वकीलांनी शक्य ते सर्व प्रयत्न केलेत. वेगवेगळे युक्तिवाद केलेत. पण आर्यनला जामीन मिळू शकला नाही. वृत्तानुसार, न्यायाधीशांनी जामीन नाकारताच आर्यन प्रचंड अस्वस्थ झाला.
याआधी 14 ऑक्टोबरला आर्यनच्या जामीनावर सुनावणी झाली होती. पण न्यायाधीशांनी आपला निर्णय राखून ठेवला होता. याच्या 6 दिवसांनंतर आर्यनला जामीन मिळेलच, अशी आशा शाहरूख खान, गौरी खानला होती. बॉलिवूड इंडस्ट्री आणि शाहरूखच्या (Shah Rukh Khan) चाहत्यांनाही हीच अपेक्षा होती. पण न्यायाधीशांनी आपला निकाल सुनावला आणि आर्यन शिवाय त्याचा मित्र अरबाज मर्चंट व मुनमुन धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. जामीन याचिकेवरचा हा निर्णय येताच प्रोटोकॉल नियमानुसार, तुरूंगातील अधिका-यांनी आर्यनला या निर्णयाची माहिती दिली.

‘आज तक’ने तुरूंगातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, जामीन रद्द होताच आर्यन खान प्रचंड अस्वस्थ झाला. यानंतर तो आपल्या बराकीत चुपचाप एका कोप-यात जावून बसला. तेव्हापासून तो शांत आहे.  कोणाशीही तो बोलत नाहीये. कदाचित आर्यनची ही अवस्था बघूनच  शाहरूख खान आज लेकाला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरूंगात गेला होता. शाहरूख तुरूंगात जात असतानाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्यनला मुंबईच्या आर्थर रोड तुरूंगात ठेवण्यात आलं आहे. अन्य  कैद्यांसारखा तो राहतोय. तुरूंग प्रशासनाने त्याला कुठलीही विशेष वागणूक दिलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनला तुरुंगातील जेवण आवडलेलं नाही. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून तो केवळ बिस्कीट खातोय. कँटीनमधून आवश्यक वस्तू खरेदी करता याव्या म्हणून शाहरूखने त्याला 4500 रूपयांची मनीऑर्डर पाठवली होती. 
3 ऑक्टोबर रोजी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एका हायप्रोफाईल क्रूझवरील रेव्ह पार्टीमध्ये ( Mumbai Cruise Drugs Case)अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. दरम्यान आता आर्यनच्या वकिलाने मुंबई हायकोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

Web Title: Aryan Khan Reaction After Mumbai Special Court Once Again Rejected His Bail Plea In Mumbai Cruise Drugs Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.