NCB ऑफिसमध्ये जाताना सायकॉलॉजिकल थ्रिलर वाचत होता Aryan Khan, समोर आला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 04:02 PM2021-11-05T16:02:57+5:302021-11-05T16:04:08+5:30
शुक्रवारी सकाळी आर्यन खान एनसीबीच्या (NCB) ऑफिसमध्ये पोहोचला. तो जामीनाच्या अटींनुसार, एनसीबी ऑफिसमध्ये हजेरी लावण्यासाठी आला होता. यादरम्यान आर्यन खानच्या हातात एक पुस्तक दिसलं.
बॉलिवूड स्टार शाहरूख खान (Shahrukh Khan) आणि गौरी खानचा (Gauri Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या ड्रग्स केसमुळे (Drugs Case) चर्चेत आहे. गेल्या आठवड्यातच तो जामीनावर बाहेर आला. शुक्रवारी सकाळी आर्यन खान एनसीबीच्या (NCB) ऑफिसमध्ये पोहोचला. तो जामीनाच्या अटींनुसार, एनसीबी ऑफिसमध्ये हजेरी लावण्यासाठी आला होता. यादरम्यान आर्यन खानच्या हातात एक पुस्तक दिसलं.
काय वाचत होता आर्यन?
आर्यन खान एनसीबीच्या ऑफिसमध्ये शाहरूख खानचा बॉडीगार्ड रविसोबत पोहोचला होता. एनसीबीच्या ऑफिसमध्ये येत असताना आर्यन खान एक पुस्तक वाचत होता. हे पुस्तक त्याच्या हातात दिसलं. लक्ष देऊन पाहिलं तर लक्षात येतं की, आर्यन एक सायकॉलॉजिकल थ्रिलर पुस्तक वाचत होता. ज्याचं नाव आहे 'द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू'.
हे पुस्तक स्वीडिश लेखल स्टीग लारसनने लिहिलं आहे. या नावाने एक सिनेमाही आला होता. या सिनेमात जेम्स बॉन्ड अभिनेता डॅनिअल क्रेग आणि अभिनेत्री रूनी मारा मुख्य भूमिकेत दिसले होते. या सिनेमाला बेस्ट अचीवमेंट इन फिल्म एडिंगमध्ये ऑक्सर मिळाला होता. त्यासोबत चार इतर नामांकनेही मिळाली होती.
आर्यन खानच्या जामीनाच्या अटी पाहिल्या तर त्यात सांगण्यात आलं आहे की, त्याला त्याचा पासपोर्ट स्पेशल कोर्टाकडे जमा करावा लागेल. त्यासोबतच तो मुंबई किंवा देश सोडून एनसीबीच्या परवानगीशिवाय जाऊ शकत नाही. तसेच यासाठी त्याला स्पेशल कोर्टाकडून परवानगी घ्यावी लागेल.