आशा भोसलेंसह सचिन-सुप्रिया डिनरला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2016 02:07 AM2016-02-21T02:07:49+5:302016-02-21T02:07:49+5:30

सर्वांची लाडकी जोडी सचिन-सुप्रिया त्यांच्या बहारहार अभिनयाने सर्वांच्याच मनात घर करून आहेत. टीव्हीवरील रिअ‍ॅलिटी शोमध्येदेखील सहभागी होऊन या जोडीने बाजी मारली होती.

Asha Bhosale, Sachin Supriya Dinner! | आशा भोसलेंसह सचिन-सुप्रिया डिनरला!

आशा भोसलेंसह सचिन-सुप्रिया डिनरला!

googlenewsNext

सर्वांची लाडकी जोडी सचिन-सुप्रिया त्यांच्या बहारहार अभिनयाने सर्वांच्याच मनात घर करून आहेत. टीव्हीवरील रिअ‍ॅलिटी शोमध्येदेखील सहभागी होऊन या जोडीने बाजी मारली होती. मराठी इंडस्ट्री असो किंवा बॉलीवूड या दोघांची ही एव्हरग्रीन जोडी सगळ्यांनाच भावते. नुकतेच त्यांनी गायिका आशा भोसले यांच्यासोबत डिनर केले. आशातार्इंना या दोघांबद्दल इतके प्रेम आहे की, त्यांनी डिनरच्या वेळीचा सचिन-सुप्रियासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत आशातार्इंनी निळ्या रंगाची साडी, मोत्याची माळ घातलीय, तर सुप्रिया पिवळ्या कलरच्या पंजाबी सूटमध्ये दिसत आहे. सचिन आणि सुप्रिया या दोघांनीही आशातार्इंच्या हातात हात दिले असून, त्यांच्या नात्यातील ऋणानुबंधच या फोटोतून पाहायला मिळतो. ‘एन्जॉएबल डिनर विथ सचिन अँड हिज वंडरफुल वाइफ सुप्रिया’ अशा शब्दांत आशातार्इंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

Web Title: Asha Bhosale, Sachin Supriya Dinner!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.