गौहर खाननंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, लग्नाच्या सहावर्षानंतर दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 03:37 PM2023-05-16T15:37:02+5:302023-05-16T15:39:42+5:30

अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) आणि नेहा मर्दानंतर आणखी एक अभिनेत्री आई होणार आहे.

Ashka goradia announces 3 months pregnancy good news with fans says beach baby is on the way | गौहर खाननंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, लग्नाच्या सहावर्षानंतर दिली गुडन्यूज

गौहर खाननंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, लग्नाच्या सहावर्षानंतर दिली गुडन्यूज

googlenewsNext

 अलिकडेच टीव्ही अभिनेत्री गौहर खान  (Gauahar Khan) आणि नेहा मर्दा यांनीही पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. आता आणखी एका टीव्ही अभिनेत्रीने चाहत्यांना तिच्या प्रेग्नेंन्सीची खुशखबर दिली आहे. लगी तुझसे लगन, डायन, कुसुम आणि नागिन यांसारख्या हिट शोमध्ये दिसलेल्या आशका गोराडिया (Ashka Goradia) लवकरच आई होणार आहे. अलिकडेच तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. 

३७ वर्षीय आशकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने सांगितले की, लवकरच तिची 'बीच बेबी' या जगात येणार आहे. आशकाच्या या पोस्टवर कमेंट करत अनेक युजर्सनी तिचे अभिनंदन केले आहे. आशका गोराडिया आणि ब्रेंट ग्लोब यांनी 1 डिसेंबर 2017 रोजी लग्न केले. आता लग्नाच्या 6 वर्षांनंतर हे कपल आई-वडील होणार आहेत.  अभिनेत्री नोव्हेंबर 2023 मध्ये तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे, त्यामुळे ती खूप आनंदी आहे. 

आशका आणि ब्रेंटच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचे तर दोघेही पहिल्या नजरेतच एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघे वेगासमध्ये भेटले आणि आशकाच्या ट्रिपचा शेवटच्या दिवशी तिला कळले की तिचे आयुष्य कायमचे बदलेल. तेव्हा ते भेटले आणि ब्रेंटने आशकाशी संपर्क साधला. जरी, सुरुवातीला आशका इतकी सिरिअस नव्हती, परंतु नंतर तिला तिच्या भावना समजल्या आणि तिने पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
 

Web Title: Ashka goradia announces 3 months pregnancy good news with fans says beach baby is on the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.