अशोक सराफ यांच्यासह ९४ कलावंतांना ‘संगीत नाटक अकादमी’ प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 02:53 PM2024-03-07T14:53:06+5:302024-03-07T14:54:36+5:30
हा कार्यक्रम दिल्लीतील विज्ञान भवनात पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, कलाकारांनी आपल्या कलेचा समाजहितासाठी उपयोग केल्याची अनेक उदाहरणे आहेत.
नवी दिल्ली : प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत कलाप्रकारांना उच्च स्थान दिले गेले आहे. भरतमुनींच्या नाट्यशास्त्राला वेदांच्या बरोबरीने स्थान देऊन त्याचा पाचवा वेद म्हणून उल्लेख करण्यात आला होता, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले. २०२२ व २०२३ या वर्षांसाठीचे संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार ९४ कलावंतांना राष्ट्रपतींच्या हस्ते बुधवारी प्रदान करण्यात आले. त्यावेळी प्रख्यात अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपतींनी हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
हा कार्यक्रम दिल्लीतील विज्ञान भवनात पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, कलाकारांनी आपल्या कलेचा समाजहितासाठी उपयोग केल्याची अनेक उदाहरणे आहेत.
“कलाकार त्यांच्या कलेतून रूढीवादी प्रवृत्तींना आव्हान देतात. ते आपल्या कलेतून समाजप्रबोधन करतात. आमच्या कला या भारताच्या सॉफ्ट-पॉवरचे सर्वोत्तम उदाहरण आहेत. म्हणूनच त्या भारताच्या परराष्ट्र धोरणाचा महत्त्वाचा भाग आहेत. देशातील कलाकार संगीत आणि नाटकाच्या विविध प्रकार आणि शैलींद्वारे भारतीय कला परंपरा समृद्ध करत राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.