अशोक सराफ यांच्या 'फेकाफेकी' सिनेमातील 'ही' अभिनेत्री आठवते का? 34 वर्षानंतर दिसते अशी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 02:34 PM2023-08-08T14:34:28+5:302023-08-08T14:35:40+5:30
Aradhana deshpande: अनेक हिंदी मराठी मालिकांसह सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं.
अशोक सराफ (ashok saraf) आणि लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde) यांची मुख्य भूमिका असलेला फेकाफेकी हा सिनेमा आज अनेकांच्या लक्षात असेल. १९८९ मध्ये बिपीन वर्टी यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा चांगला लोकप्रिय झाला होता. या सिनेमामध्ये लक्ष्मीकांत आणि अशोक सराफ यांच्याव्यतिरिक्त सविता प्रभुणे (savita prabhune), निवेदिता सराफ (nivedita saraf), अजय वाढवकर, चेतन दळवी अशा कितीतरी लोकप्रिय कलाकारांनी स्क्रीन शेअर केली होती. यामध्येच आज आपण आराधना देशपांडे यांच्याविषयी जाणून घेऊ.
'फेकाफेकी' या सिनेमामध्ये अभिनेत्री आराधना देशपांडे यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. या सिनेमात त्या सविता प्रभुणे यांच्या बहिणीच्या म्हणजेच रश्मी या भूमिकेत झळकल्या होत्या. यावेळी त्यांच्या अभिनयासह सौंदर्याचीही चर्चा रंगली होती. परंतु, आता ही अभिनेत्री काय करते?कशी दिसते असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडतात. आराधना देशपांडे यांनी सिनेमासह मालिका, नाटकांमध्येही काम केलं होतं. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये त्यांचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. परंतु, सोशल मीडियावर त्या सक्रीय आहेत.
आराधना देशपांडे यांचे गाजलेले नाटक आणि सिनेमा
‘वन रूम किचन’, ‘तुला हवंय काय’, ‘रायगडाला जेव्हा जग येतं’ या नाटकांतून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. तर, ‘आई पाहीजे’, ‘दे टाळी’, ‘फेकाफेकी’, ‘रंगत संगत’, ‘सारेच सरस’ या मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी बॉलिवूडच्या ‘पनाह’, ‘सनम हम है आपके’ आणि ‘बेदर्दी’ या सिनेमांमध्येही काम केलं आहे.
आराधना यांच्या गाजलेल्या मालिका
आराधना देशपांडे यांनी ‘परमवीर’, ‘हॅलो इन्स्पेक्टर’, ‘बंदिनी’, ‘धनंजय’, ‘संसार माझा वेगळा’, ‘घरकुल’, ‘दामिनी’, ‘तांडा चालला’, ‘आई’, ‘एक होता राजा’ आणि ‘चार दिवस सासूचे’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं. तर हिंदीमध्ये ‘कौन अपना कौन पराया’, ‘सर्च’, ‘खोज’, ‘सुहाग’ आणि ‘सीआयडी’ मालिकांमध्ये झळकल्या.